Read in
बुधवार 23 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 23 फेब्रुवारी चंद्ररास तूळ 08.55 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 14.40 पर्यंत व नंतर अनुराधा.
बुधवार 23 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 23 फेब्रुवारी चंद्ररास तूळ 08.55 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 14.40 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुम्ही करत असलेल्या व्यवसायाच्या विकासाबाबत योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. आज हिशोबीपणाने वागून त्याचा अनुभव घ्. ा.
वृषभ :–मानसिक सकारात्मकता सर्वच आघाड्यांवर मोलाची ठरेल. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल.
मिथुन :–कौटुंबिक संघर्ष टाळून वाद वाढवू नका. तुमच्या सल्ला देण्याच्या सवयीमुळे आज अचानक एखाद्याला अडचणीतून बाहेर काढाल.
कर्क :–आजच्या दिवसात तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तोंड देताना अडचणी निर्माण होतील. वाहन चालवताना वाहनात बिघाड होण्याचा धोका आहे.
सिंह :–: आपल्या नोकरीतील जबाबदार्या सांभाळून कौटुंबिक जबाबदारीही फार पाडावी लागेल. विनाकारण प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.
कन्या :–अशक्तपणा जाणवत असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना आज मानसिक आनंद मिळणार माही.
तूळ :--़आज प्रत्येक कामामधे कांही ना कांही अडचणी निर्माण होतील. कोणत्याही कामात निर्णयापर्यंत येऊ नका.
वृश्र्चिक :– वृद्धांना आज विस्मरणाचा त्रास जाणवेल. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
धनु :– तरूण वयाच्या मुलामुलींना आपल्या अपेक्षा पालकांकडून पूर्ण होणार असल्याची खात्री मिळेल. समोरील व्यक्तीवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
मकर :–स्वत:ला आलेल्या अनुभवांचे धडे इतरांना द्याल. आईला सामाजिक स्तरावर मान सन्मान मिळेल.
कुंभ :–जुन्या मागिल गुंतवणूकीवर आज चांगला लाभ होईल. वाहन चालवताना वाहनाच्या गतीवर नियंत्रण आवश्यक आहे.
मीन :–आज बँकेची कामे स्वत:ची स्वत: करा. इतरांवर अवलंबून राहू नका. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून सांभाळणे अवघड जाईल.
|| शुभं-भवतु ||