daily horoscope

मंगळवार 22 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 22 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 22 फेब्रुवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 15.35 पर्यंत व नंतर विशाखा.

मंगळवार 22 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

मंगळवार 22 फेब्रुवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 15.35 पर्यंत व नंतर विशाखा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–व्यवसायातील अडीअडचणींवर योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लहान सहान गोष्टींवर अतीविचार करत बसू नका.

 

वृषभ :– अकारण आपल्या निर्णयात बदल करू नका. प्रलोभने व आश्वासने यापासून दूर रहा. ताज तुमची कसोटीची वेळ आहे.

 

मिथुन :–प्रवासामधे चांगली ओळख होईल. पतीपत्नीमधील वादविवादात कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.

 

कर्क :–महत्वाची कागदपत्रे हरवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आज मेहनतीची तयारी ठेवा.

 

सिंह :–आहारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे याची जाणिव होईल. नोकरीतील वरिष्ठांचे तुमच्या बाबत झालेले मत आज बदलणार आहे  तरी संयम आवश्यक.

 

कन्या :–मित्रमैत्रिणींना दिलेला शब्द पाळावा लागेल. दुसर्यांच्या मनातील गोष्टी व विचार ओळखाल.

 

तूळ :–निस्वार्थी वृत्तीने इतरांना मदत कराल. कुटुंबातील मुलांबाबतचा निर्णय तारतम्याने घ्यावा लागेल.

 

वृश्र्चिक :–आपल्याच मनावर ताबा न राहिल्याने समोरील व्यक्ती ला दोष देऊ नका. उतावळेपणा ए निर्णयाची घाई करू नका.

 

धनु :—महत्वाकांक्षेतही जाणिव झाल्याने तुमच्या विचारांत बदल होतील. उगाचच साहसी वृत्तीचे प्रदर्शन कराल.

 

मकर :–तुमच्या मनातील कठोर विचारांमुळे समोरील व्यक्ती तुमच्या पासून दूर जाईल. मनातील पैशाविषयीच्या योजना फलद्रूप होण्याचे संकेत मिळतील.

 

कुंभ :–महत्वाकांक्षी विचारांपुढे कोणतेही विचार टिकणार नाहीत. अंगावर पडलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडाल.

 

मीन :–कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मोठेपणाच्या खोट्या कल्पनेमुळे खर्चात वाढ होईल.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *