daily horoscope

सोमवार 21 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 21 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 21 फेब्रुवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 16.16 पर्यंत व नंतर स्वाती.

सोमवार 21 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

सोमवार 21 फेब्रुवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 16.16 पर्यंत व नंतर स्वाती. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–स्वत:चे विचार पक्के असले तरी इतरांच्या मतांचा आदर करा. नोकरीत सहकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल या भरवशावर राहू नका

 

वृषभ :–अनोळखी व्यक्तींवर विसंबून राहिल्याने ठरलेल्या कामाला विलंब होईल. सरकारी कामाच्या परवानगीसाठी प्रयत्न निष्फळ ठरेल.

 

मिथुन. :– नोकरीतील कामाबाबतचा तुमची भूमिका स्पष्टपणे समजून घ्या. वैयक्तिक जीवनात सांभाळून रहावे लागेल.

 

कर्क :–तुमच्या कामामध्ये झालेल्या नुकसानीबद्दल इतरांना जबाबदार धरू नका. कुटुंबातील वातावरण अतिशय ताणतणावाचे राहील तरी तुम्ही मौन पाळा.

 

सिंह :–अपरिचित मंडळींसमोर आपल्या कामातील गुप्त गोष्टी उघड करू नका. संततीकडून प्रगतीच्या आनंददायक बातम्या  ऐकू येथील.

 

कन्या :– आज तुमच्या दिमतीला कोणीही येणार नाही. स्वत:ची जबाबदारी इतरांवर टाकता येणार नाही. कितीही त्रास झाला तरी तुमचे काम तुम्हालाच करावे लागणार आहे

 

तूळ :–राहत्या जागेचा प्रश्न सोडवताना अचानक भावनेच्या आहारी जाल. सामाजिक पातळीवर काम करताना मोठ्या पदाधिकार्यांच्या भेटीगाठी होतील

 

वृश्र्चिक :–नोकरीत सहकारी वर्गाबरोबर मिळते जुळते घ्यावे लागेल. वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी प्रथम वेळेचे महत्व ओळखा. 

 

धनु :–नव्या आव्हानांना अगदी उत्तम प्रकारे आत्मविश्वासाने सामोरे जाल. कोणत्याही कागदपत्रांवर न वाचता सही करू नका

 

मकर :–  स्वत:केलेल्या कामात सुद्धा आत्मप्रौढी करू नका. नोकरीतील तुमच्या विषयीच्या आधाराला तडा जाईल असे काहीही करू नका

 

कुंभ :–स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून नोकरीतील जबाबदारी स्विकार करा. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे आज इतरांना प्रेरणा मिळणार आहे

 

मीन :–व्यवसायातील अडचणीच्या प्रसंगात वडिलधार्‍या चा सल्ला उपयोगी पडेल. पतीपत्नीच्या एकमतामुळे अवघड काम सहजपणे शक्य होईल

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *