Read in
रविवार 20 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 26 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 20 चंद्ररास कन्या 28.30 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 16.41 पर्यंत व नंतर चित्रा.
रविवार 20 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 26 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 20 चंद्ररास कन्या 28.30 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 16.41 पर्यंत व नंतर चित्रा. सोमवार 21 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 16.16 पर्यंत व नंतर स्वाती. मंगळवार 22 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती न15. 35 पर्यंत व नंतर विशाखा. बुधवार 23 चंद्ररास तूळ 08.55 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 14.40 पर्यंत व नंतर अनुराधा. गुरूवार 24 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 13.30 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. शुक्रवार 25 चंद्ररास वृश्र्चिक 12.07 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12.07 पर्यंत व नंतर मूळ. शनिवार 26 चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 10.31 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
वरीलप्रमाणे प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 22.01 ( मुंबई.)
शुक्रवार श्री रामदास नवमी.
शनिवार विजया स्मार्त एकादशी.
मेष :–व्यवसायातील ज्या गोष्टी तुम्हाला कायदेशीर बाबतीत किंवा अँग्रीमेंटच्या स्वरूपात करावयाच्या असतील त्या करण्यास हा सप्ताह अनुकूल आहे. नोकरीमध्ये वरीष्ठांबरोबर चा तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांनी या संधीचा कसा उपयोग करून घेता येणार आहे.आपल्या क्षमता ओळखून नंतरच इतरांना आश्वासन द्या नाहीतर अडचणीत याल. इतरांना आलेल्या संकटातून बाहेर काढण्याची पराकाष्ठा कराल.प्रत्येक काम स्वत:च्या पद्धतीनेच करायचा हट्ट करू नका.
वृषभ :– आज पासून नव्याने सुरू होणाऱ्या कामाला प्राधान्य देणारा हा आठवडा तुम्हाला सर्वच दृष्टीने अ तिशय लाभदायक ठरणार आहे. कोणत्याही प्रकारचे लेखी व्यवहार करत असाल तर त्याबाबत अतिशय सावधपणे करावे लागतील. देण्याघेण्याचे व्यवहार आर्थिक व्यवहार पूर्ण विचाराने करावेत. राजकीय क्षेत्रातील मंडळींना विरोधकांना कोंडीत पकडता येणार आहे. महिलांच्या बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी कमी होत असल्याचे जाणवेल. जवळच्या नातेवाइकांकडून तुमच्या तातडीच्या व अत्यावश्यक कामात भरघोस मदत होईल. या सप्ताहात तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
मिथुन :–हातातील कामाचे योग्य ते नियोजन केल्यास सर्वच कामे वेळेवर होत असल्याचे जाणवेल. तरुणांना घरापासून अचानक दूर जाण्याचे योग आहेत. कोणतीही गोष्ट सहजपणे घडणार नसल्यामुळे परिस्थिती बरोबर जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबातील तुमच्या कर्तव्याने जबाबदारीला प्राधान्य देत असताना स्वतःकडे दुर्लक्ष होणार आहे तरी आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वाहन चालवताना बेफिकिरीने व बेजबाबदारपणे चालवू नये. तरुणांना आपल्या हातातील अधिकार वापरताना कसोटीचे क्षण येणार आहेत तरी पूर्ण विचाराने वस्तुस्थिती हाताळावी लागणार आहे.
कर्क:– मानसिक शांतते पुढे कोणत्याही गोष्टींना जास्त महत्व न देता मनाची शांतता राखण्याचा प्रयत्न करा. क्रोधावरही नियंत्रण ठेवल्यास बऱ्याच गोष्टींचा त्रास कमी होईल. आर्थिक स्थिती बळकट असूनही इतरांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती जास्त दिले जाणार आहे कुटुंबातील जोडीदाराबरोबर समंजसपणे वागल्यास कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. स्वत:चे चातुर्य दाखवताना इतरांना कमी लेखू नका. सर्वांकडून आदरयुक्त वागणूक मिळेल.
सिंह:– सतत आपणच विजयी होणार या विश्वासावर राहिल्याने स्वतः संकटाच्या वेळी गाफील राहणार आहात. येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन संकटात कसे वागावे याचा प्रथम विचार करावा लागेल. तरुणांना पूर्वी केलेल्या कामामुळे झालेला नावलौकिक या खेपेला उपयोगी येईल. जबाबदारीतून बाहेर पडताना स्वतःची मेहनत न वाढवता इतरांना जबाबदार धरू नका. नोकरीच्या ठिकाणी इतरांबरोबर समंजसपणाचे पण कणखर धोरण स्वीकारल्यास वाद होणार नाहीत. तुमच्या बोलण्यातील धडाडी मुळे इतरांवर छाप पडणार आहे.
कन्या :– घराच्या सुशोभीकरण करताना पूर्वी ठरवलेले प्लान्स रद्द करून पुन्हा नव्याने प्लॅनची आखणी कराल. आपल्या अधिकारातील कागदपत्रे जपून सांभाळून ठेवण्यात तुमच्याकडून चूक झालेली आहे, दुर्लक्ष झालेले आहे हे लक्षात येईल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या ओळखीतील जवळच्या व्यक्तीला जामीन राहावे लागेल. राजकीय क्षेत्रातील कामात मेहनती पेक्षा नियोजनाला जास्त महत्त्व दिल्यास कामे व्यवस्थित होतील. अंगावर पडलेली जबाबदारी पार पाडताना वस्तुतः तुमचा परीक्षेचा प्रसंग आहे हे लक्षात घ्या.
तूळ:– तुमच्याकडे जवळच्यानी केलेली पैशाची मागणी कशासाठी आहे हे पडताळून पाहूनच मदत करा. या सप्ताहात तुमची शारीरिक शक्ती अतिशय उत्कृष्ट राहिल्याने पेंडिंग राहिलेली कामे मार्गी लावता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा बाबतची केलेली तयारी पुरेशी नसल्याचे त्यांच्या लक्षात येईल. तरुणानी आपल्या रागावर नियंत्रण मिळवल्यास संघर्षाचा प्रश्न निर्माण होणार नाही. व्यवसायातील कायदेविषयक अडचणी तिथल्या तिथे सोडवाव्यात. मित्राच्या व्यवहारात सल्लागाराचे काम उत्कृष्टपणे कराल.
वृश्चिक:– समोर आलेल्या संकटाचा बाऊ करण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याच्या मार्ग शोधल्यास योग्य दिशा सापडेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा व तज्ञांचा सल्ला यावेळी महत्त्वाचा ठरेल. स्वतःचा अहंकार जपून वैयक्तिक गोष्टी अति महत्त्वाच्या करू नका. स्वतःवर असलेला विश्वास अडचणीच्या कामात यश मिळवून देईल. कौटुंबिक स्तरावर जोडीदाराबरोबर समंजसपणे वागल्यास कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. लहान मुलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मुलांना पाण्यापासून जपावे लागेल. अतिशय चिकित्सेमुळे न घडलेल्या गोष्टीही मानसिक क्लेश देतील.
धनु:– अचानक या सप्ताहात प्रवासाचे योग येणार आहेत. नोकरीतील अधिकारी वर्गास आपले अधिकार वापरताना जपून वापरावे लागतील व कोणतेही काम करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल. प्रवासात स्वतः वाहन चालवत असाल तर अतिशय काळजीपूर्वक चालवावे लागेल. व्यवसाय त्यात भागीदार का बरोबर असलेले मतभेद मिटवून काम करावे लागेल. संघटनात्मक पातळीवर काम करताना कोणत्याही नवीन अडचणी निर्माण होणार नाहीत याची दखल घ्या. जुन्या कोर्टकचेरीच्या कामात व्यत्यय येणार असल्याने कोणतीही घाई करू नये.
मकर:– या सप्ताहात लाचलुचपत किंवा आर्थिक देणे-घेणे यापासून हातभर दूर रहावे लागेल. प्रत्येक गोष्टी करताना चिकित्सा करून मगच त्यात हात घालावा. महिलांना आलेल्या तणावातून मार्ग काढताना पुन्हा नवीन अडचणी उभ्या राहतील. बुद्धिमान पण जिद्दी असलेल्यानी स्वतःवर अति विश्वास ठेवून कोणत्याही संकटात उडी मारू नये. त्याच बरोबर घडणाऱ्या परिस्थितीचा राग इतरांवर काढू नये. नोकरीच्या ठिकाणी काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. हॉस्पिटल्स, आश्रम, वृद्धाश्रम येथे सेवावृत्तीने काम करणाऱ्यांच्या कर्तुत्वाला, कार्याला लोकांकडून सलाम मिळेल. वयस्कर मंडळीना स्वतःचे मन मारून स्थलांतर करावे लागेल.
कुंभ:– प्रेम विवाहाच्या व्यवहारात रूढी सोडून कोणतीही गोष्ट करत असाल तर त्याचे परिणाम त्रासदायक होणार आहेत याची दखल घ्या. व्यावसायिक क्षेत्रातील मंडळींना कर्जाबाबतची मिळालेली खात्री फसवी ठरेल. तरुण मंडळींना एखादा साथीचा रोग त्रास देईल व व्यसनाच्या आधीन असलेल्यांना मात्र अतिशय मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. शिक्षणात खंड पडलेल्यांनी आपले शिक्षण पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांची भेट घ्यावी, शिक्षण व्यवस्थित सुरू होण्याचे योग आहेत. राजकीय मंडळींना आपल्या प्रतिस्पर्धी व विरोधी लोकांबरोबर मिळतेजुळते घेऊन कार्यभाग साधावा लागेल. नोकरदार मंडळींना वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल.
मीन:– शारीरिक क्षमता व आजूबाजूची परिस्थिती पाहून मगच मोठे धाडस कराल. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रथम योग्य नियोजन करून ते तज्ञांच्या संमतीनेच पुढील विचार करावा. कुटुंबातील मानापमानाच्या नाट्याला सामोरे जावे लागेल व्यक्तींकडून आरोप होतील दत्तक पत्र असलेल्यांना हा सप्ताह अतिशय काळजीपूर्वक वागण्याचा सूचना देत आहे कोणत्याही क्षेत्रातील कष्ट करताना सहकारी पूर्ण मदत करतील. आई वडील यांच्या आजारपणात मोठी सेवा करावी लागेल.
|| शुभं-भवतु ||