Read in
शनिवार 19 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 19 फेब्रुवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 16.50 पर्यंत व नंतर हस्त.
शनिवार 19 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 19 फेब्रुवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 16.50 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे )
मेष :–आज विवाहाबाबतचे कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरी बाबतही तुमचे विचार कोणासमोरच व्यक्त करू नका.
वृषभ :–नोकरीच्या बाबतीत करावयाचा बदल एकट्याच्या विचाराने करू नका. अनेक न पटणार्या गोष्टी घडणार आहेत.
मिथुन :–शेअरमार्केटच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास नुकसान होईल. संततीबाबतची निर्णय सहविचाराने घ्यावे लागतील.
कर्क :– प्रौढ मंडळींच्या शिक्षणात पडलेला खंड भरून काढण्याकरता दूरशिक्षणाचा मार्ग सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना सेवाभावी कामासाठी विचारले जाईल.
सिंह :–सरकारी नोकरीतील अधिकारी वर्गास गुंतागुंतीचे काम स्विकारावे लागेल. जुन्या व्यवहारातील तुमचे झालेले नुकसान भरून मिळणार असल्याचा निरोप येईल.
कन्या :–प्रौढ व्यक्तींना दैनंदिन कामे करतानाच आपल्या एखाद्या छंदाबाबत ओढ निर्माण होईल. कुटुंबातील भावाबहिणींच्या नात्यातील वाद संपत असल्याचे लक्षांत येईल.
तूळ :–तुमच्या हातातील नकारात्मक कामासाठी तज्ञांचा अचानक सल्ला, मार्गदर्शन मिळेल. प्रकृती अस्वास्थ्य वाटत असलेल्यांना आज बर्यापैकी बरे वाटू लागेल.
वृश्र्चिक :–नातेवाईकांच्या बाबतीत तुम्हाला अचानक एखादा खंबीर निर्णय घ्यावा लागेल. दूर गावी राहणार्या व एकटेपणाला कंटाळलेल्याना पुन्हा कुटुंबात एकत्र राहता येणार आहे.
धनु :–घरगुती व्यवसायात नवीन बदल करण्याच्या येणार्या संधीचा फायदा घ्या. वडीलांच्या प्रतिष्ठेमुळे कांही गोष्टी सोप्या होतील.
मकर :–अध्यात्मिक उपासना करणार्यांना मानसिक स्वास्थ्य देणार्या घटना घडतील. एखादा दूरचा प्रवास ठरवला असेल तर तो रद्ध करावा लागणार आहे.
कुंभ :–आजारपणातून बरे वाटण्यासाठी डाँक्टरांचा सल्ला मानावा लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये.
मीन :–लहान मुलांच्या बाबतीत आज तुम्हाला वाहनापासून सांभाळावे लागेल. महत्वाची कागदपत्रे सहजपणे सापडणार नाहीत खूप शोधावी लागतील.
|| शुभं-भवतु ||