Read in
शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 18 चंद्ररास सिंह 22.45 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 16.41 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.
शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शुक्रवार 18 चंद्ररास सिंह 22.45 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 16.41 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–पिढीजात चालणार्या व्यवसायात लक्ष घालावे असे सर्वानुमते चर्चा होईल. परदेशात शिक्षण झालेल्यांना आता नवीन नोकरीची संधी मिळेल.
वृषभ :–आईवडीलांच्या इच्छेखातर मुलांकडून विवाहाबाबतच्या विचारात बदल होईल. व्यवसायातील मागिल येणी वसूल होऊ लागतील.
मिथुन. :–आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाबाबतच्या तुमच्या मतात बदल होईल. मित्रमंडळींची तुमच्या हातातील कामाला मनापासून मदत मिळेल.
कर्क :–मानसशास्त्राच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू.
सिंह :–आज कोणत्याही शर्यतीत तुम्हालाच विजय प्राप्त करता येणार आहे. ज्यांच्याबरोबर कायदेशीर वाद आहेत त्यांच्याबरोबर जपून बोला.
कन्या :–पतीपत्नीमधील प्रेमात वाढ होऊन कुटुंबातील दुरावा कमी होईल. पाठदुखी, मानदुखी या त्रासामुळे हैराण झालेल्यांनी त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
तूळ :–पूर्वीच्या केलेल्या गुंतवणूकीतून आज फारसा चांगला फायदा होणार नाही. कर्जफेडीबाबतची तुमची मते घरातील मंडळीना पटणार नाही.
वृश्र्चिक :–आजारपणाला कंटाळलेल्या वयस्कर मंडळीना तुमचा खूप मोठा आधार वाटेल. व्यवसायासाठी तरूण वर्गाने सल्ल्याशिवाय व्यवहार करू नयेत.
धनु :–व्यवसायात भागिदाराने दिलेला शब्द पाळला न गेल्याने ऐन वेळी गडबड होणार आहे. मानसिक शांततेची गरज आहे.
मकर :–आज आवश्यक नसल्यास प्रवास करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुमच्या मताला आज खूपच महत्व मिळेल.
कुंभ :–राजकीय मंडळीना एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती होणार असल्याचे कळेल. कोर्टकेसच्या बाबतीत जराही दुर्लक्ष करू नका.
मीन :–नव्याने झालेल्या ओळखीचा महत्वाच्या कामासाठी उपयोग होणार आहे. मनावर ताबा ठेवून हट्टीपणा आ मुरड घालावी लागेल.
|| शुभं-भवतु ||