Read in
गुरूवार 17 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 17 फेब्रुवारी चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 16.10 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
गुरूवार 17 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
गुरूवार 17 फेब्रुवारी चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 16.10 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज गुरूप्रतिपदा असून श्री गाणगापूर क्षेत्राची यात्रा आहे
मेष :–शेअर मार्केटचे व्यसन असलेल्यांनी व्यवसायाचा अतिरेक करू नये. मैदानी खेळाच्या खेळातील निपुण असलेल्याने इतरांचे ऐकून आपले मत बदलू नये.
वृषभ:– पिण्याचे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ याबाबत अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. आज तुमचे मन, चित्त अतिशय शांत राहील. त्यामुळे बरेच विचार सुचतील.
मिथुन:– जाहिरात व प्रसार, प्रसिद्धी माध्यम यात नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. महत्वाच्या कामाची कींमत ओळखावी लागेल.
कर्क:– जोडीदाराच्या बाबतीत भाग्यदायी घटना घडणार असल्याची सूचना मिळेल. श्रवण यंत्र लावूनही ज्या वयस्कर मंडळींना ऐकू येत नाही त्यानी तातडीने कान तपासून घ्यावेत, कानाचे एखादे दुखणे उद्भवण्याची शक्यता आहे.
सिंह:– दूरध्वनी केंद्र, इंटरनेट यामध्ये कार्य करणाऱ्याने कोणत्याही प्रकारचे घाई करू नये. वडिलांच्या बाबतीत प्रकृतीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरेल.
कन्या:– लहान मुलांच्या डोळ्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. गायन-वादन कलेत निपून असलेल्याने आपला स्वतःचा एखादा कार्यक्रम ठरवायला हरकत नाही. विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीत वाढ झाल्याचे जाणवेल.
तूळ:– पुरुष मंडळींकडून कुटुंबासाठी अचानक किमती वस्तूंचे दाग दागिने खरेदी केले जातील. महिलांनी व पुरुषांनी सुद्धा खरेदी करताना आपण फसत नाही ना याची खात्री करून घ्यावी.
वृश्चिक:– बँका वित्तीय संस्था किंवा महसूल विभाग इत्यादी विभागात काम करणाऱ्या मंडळींना एखाद्या गुंतागुंतीच्या केसला सामोरे जावे लागेल विद्यार्थी वर्गाला आपल्या स्मरणशक्ती बाबत शंका व भीती निर्माण होईल.
धनु:– महिलांना कुटुंबातील सर्वात लहान मुला करिता अचानक धावपळ करावी लागेल. तरुण वर्गाला आपले धाडस, आपली धडाडी, शौर्य किंवा कर्तुत्व गाजवण्याची संधी मिळेल.
मकर:– वयस्कर मंडळींना आजचा दिवस अतिशय आनंदाचा समाधानाचा आणि कृतकृत्य ठरले. उत्तम वक्तृत्व शैलीच्या मंडळींना आपल्या वकृत्वाचा प्रभाव पाडता येईल येणार आहे.
कुंभ:– कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती बरोबर संबंध कसे असावेत याचा धडा तुम्ही इतरांना घालून द्याल. नकलाकार तसेच व्याख्याते यांना आपले मन मोकळे करता येणार आहे व सादरीकरणही करता येईल.
मीन:– कोणताही आर्थिक व्यवहार करत असलात तरी दुसऱ्या कोणाच्याही प्रभावाने व्यवहार करू नका. तुम्हाला कळलेल्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत याची शहानिशा केल्याखेरीज इतरांबरोबर कोणतीही चर्चा करू नका.
|| शुभं-भवतु ||