Read in
बुधवार 16 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 16 चंद्ररास कर्क 15.13 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 15.13 पर्यंत व नंतर मघा.
बुधवार 16 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 16 चंद्ररास कर्क 15.13 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 15.13 पर्यंत व नंतर मघा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज माघ शुक्ल पौर्णिमा 22.26 पर्यंत असून माघ स्नान समाप्तीचा दिवस आहे.
मेष :–तुमच्या हातातील अवघड कामात यशस्वी होण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. मनात येणार्या वेगवेगळ्या विचारांमुळे मानसिक ताण येईल.
वृषभ :–आज तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांना मोकळीक द्या. हातातील काम पूर्ण करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त दगदग करू नका.
मिथुन :–पूर्वी घडलेल्या प्रसंगातून घेतलेल्या अनुभवावर आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आपले म्हणणे इतरांवर लादू नका.
कर्क :–जुने वाद समंजसपणे मिटवण्याचे आज जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश येईल. परोपकारी वृत्तीमुळे आज तुम्हाला आर्थिक घस सोसावी लागणार आहे.
सिंह :–मनावरील असलेले दडपण जाण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतील. गावी गेलेल्या व्यक्तींच्या गैरहजेरीमुळे घरात उत्साह वाटणार नाही.
कन्या :–तुमच्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही निर्णयावर येऊ नका. महिलांनी आज जास्त दगदग करू नये.
तूळ :–लहान मुलांच्या मनात आज असुरक्षिततेची भावना वाढेल व त्यामुळे ती घाबरतील. बोलण्यात व विचारात स्पष्टपणा ठेवावा.
वृश्र्चिक :–कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका. अती महत्त्वाकांक्षेने अविचाराने सर्व जबाबदारी अंगावर घ्याल.
धनु :–आज सत्संगामधे तुम्ही मनापासून रमून जाल. हातातील कार्यात प्रयत्नांची पराकाष्ठा कराल.
मकर :–कुटुंबात शब्दाने शब्द वाढल्याने वाद निर्माण होतील. नातेवाईकांबरोबर ईल वादाचे विषय टाळण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :–प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका.
मीन :–. सध्याच्या विचारसरणीने वागल्यास फक्त मनस्तापात वाढ होईल. अनुभवांचा विचार करूनच आपले नियोजन करा.
|| शुभं-भवतु ||