Read in
मंगळवार 15 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. मंगळवार 15 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 13.48 पर्यंत व नंतर आश्लेषा.
मंगळवार 15 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. मंगळवार 15 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 13.48 पर्यंत व नंतर आश्लेषा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नोकरी व्यवसायातील मागचे कांही येणे शकल्यास येत्या दोन दिवसात मिळणार असल्याचा निरोप येईल. ग्रहांच्या गणितांची प्रचिती येईल.
वृषभ :– नोकरीत हाताखालील व्यक्तींकडून सांभाळून रहावे लागेल. घरात अचानक आनंदाचे वारे वाहू लागतील.
मिथुन :–हातातील कामाकडे दुर्लक्ष करून पुढील संधीची वाटबघू नका. व्यवसायात वडिलधार्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल.
कर्क :–व्यवसायात कर्ज काढावे लागण्याचा आज अंदाज येईल. कुटुंबात मुलांच्या उत्साहावर तुमच्याकडून नाराजी निर्माण होईल.
सिंह :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून मानहानीचा प्रसंग येईल. वयस्कर मंडळींच्या मनातील गूढ कोडाचा अंदाज येणार नाही.
कन्या :–आज तुम्हाला साध्या कामातही खूपच मेहनत करावी लागणार आहे. मित्रमैत्रिणींच्या उत्तेजनाना फारसे अवलंबून राहू नका.
तूळ :–विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही. तुमच्या धीरोदात्त विचारांचा प्रभाव इतरांवर पडेल.
वृश्र्चिक :–कुटुंबात नातेवाईकांच्या विषयामुळे लहानमोठे कलहाचे प्रसंग येणार आहेत. तुमचा मनावरील संयम महत्वाचा राहील.
धनु :-मुलांच्या कल्पनाशक्तीला वरीष्ठांनी समजून घेऊन वाव द्यावा. वयस्कर मंडळीना पाय दुखीचा त्रास जाणवेल.
मकर :– तुम्हाला आज तुमच्या आवडत्या छंदाला वेळ देता येणार आहे. आज कोणत्याही क्षेत्रात असलात तरी बोलण्याची कडक धोरण आणू नका.
कुंभ :–हातातील मोठ्या प्रोजेक्टमधे नवीन मंडळींचा सहभाग उल्लेखनीय ठरेल. बोलण्यातील प्रेमाने ज्येष्ठांचे मन जिंकला.
मीन :–दैनंदिन जीवनात तुमच्याकडून कांहीसे संशयाचे वातावरण निर्माण होईल. भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर मात करून दाखवाल.
|| शुभं-भवतु ||