daily horoscope

सोमवार 14 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 14 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 14 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 11.52 पर्यंत व नंतर पुष्य. 13.48 पर्यंत व नंतर आश्लेषा.

सोमवार 14 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

सोमवार 14 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 11.52 पर्यंत व नंतर पुष्य. 13.48 पर्यंत व नंतर आश्लेषा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

 

मेष :–वैवाहिक जोडीदाराबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याची योग्य संधी मिळेल. व्यवसायात कांही गुप्त गोष्टींचा सुगावा लागेल.

 

वृषभ :–घरातल्या शांततेसाठी युक्तीने केलेला प्रयोग यशस्वी होईल. प्रेमप्रकरणातील वाद तसेच गैरसमज दूर होण्याची चिन्हे दिसतील.

 

मिथुन :–नोकरीच्या शोधात असलेल्यांना अचानक नोकरीची संधी मिळणार असल्याने तुम्ही जागरूक रहा. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांना सन्मान मिळेल.

 

कर्क :– तुमच्या हातातील प्रकल्पात इतरांच्या  हस्तक्षेपामुळे कंही विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून काम करावे.

 

सिंह :– औषधी क्षेत्रात गुंतवलेल्या गुंतवणूकीतून आज चांगला फायदा होईल. घरातील ज्येष्ठांच्या मदतीने तुमच्या अडचणींवर उपाय सापडेल.

 

कन्या :–आज कोणतेही काम करताना फायद्याचा विचार करू नका. कोणत्याही लोभाने दुसर्यांवर विश्वास ठेवून काम करू नका.

 

तूळ :-/तुमच्या समोर आलेला जुन्या वास्तुविषयी नीट चौकशी केल्याशिवाय  कोणताही विचार करू नका. बोलण्यातून गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

 

वृश्र्चिक :–आज तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी निर्माण होईल. घरगुती प्रश्न सोडवताना भावनेच्या आहारी अडकू नका.

 

धनु :–आईवडीलांना आज मुलांबरोबर  मनसोक्त गप्पा मारता येणार आहेत. व्यवसायातील अडचणींवर अचानक न विचारातही ज्येष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.

 

मकर :–कोणतीही गोष्ट अचानक व कारणाशिवाय घडत नाही यावर पक्का विश्वास बसेल. महिलांना आज आराम मिळेल.

 

कुंभ :–कुटुंबात आज एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याविषयी नियोजन कराल. संततीच्या नावावर असलेल्या शेताबाबत अडचणी निर्माण होतील.

 

मीन :–व्यवसायात नियमांचे बंधन पाळणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होईल. संततीकडून समाधान देणार्‍या घटना घडतील.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *