Read in
शनिवार 12 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 12 फेब्रुवारी चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र व नंतरही आर्द्राच आहे.
शनिवार 12 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
शनिवार 12 फेब्रुवारी चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र व नंतरही आर्द्राच आहे. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हातात घेतलेल्या कार्यात सातत्य ठेवल्यास नक्की यश मिळणार आहे. वडीलधाऱ्यांचा आधाराने आलेल्या संकटावर मात करता येईल.
वृषभ:– वैवाहिक जोडीदाराबरोबर अचानक काहीसे संबंध बिघडण्याचा धोका आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना मनपसंत नोकरीची संधी मिळेल.
मिथुन:– पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आज चांगला फायदा होणार आहे. कुटुंबात लहानांबरोबर वादग्रस्त विषय घेऊन चर्चा करू नका व वादही वाढवू नका.
कर्क:– नोकरी किंवा व्यवसायात इतरांकडून काही संशयास्पद हालचाली जाणवतील. भभागीदारा बरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील आर्थिक परिस्थितीला थोडं सांभाळावे लागेल.
सिंह:– घरगुती वादविवादास तोंड फुटल्याने मोठ्या प्रमाणात मतभेद होऊन वाद निर्माण होतील. नोकरीत असलेल्यांना अचानक नोकरीविषयक अनास्था निर्माण होऊन दुसऱ्या नोकरीच्या शोधात जाण्याची इच्छा होईल परिचयातून नोकरी कळल्यास नक्की विचार करा.
कन्या:– घरची आघाडी काहीशी गरम राहिल्याने आज काहीही न घडताही जुन्या गोष्टींवर वाद निर्माण होईल. महिलांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर व मानसिक कौशल्यावर परिस्थितीवर मात कथा येईल.
तूळ:– प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण होतील तरी त्यातून कसा मार्ग काढायचा हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल. कुटुंबातही छोटे मोठे वादाचे प्रसंग येणार आहेत.
वृश्चिक:– नोकरीतील सहकाऱ्यांबरोबर काम करताना बुद्धी कौशल्याचा वापर करावा लागेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगली धनप्राप्ती होईल. पुरुष वर्गास पत्नीकडून अचानक धनलाभ संभवतो.
धनु:– आज तुमच्या कष्टाची, मेहनतीची खरी कसोटी आहे. वडीलधाऱ्या मंडळींच्या कडव्या मतांमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
मकर :– अहंपणा सारून योग्य वेळी नमते घ्या. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे निश्चितच कौतुक होणार आहे. पण कुटुंबात मात्र अचानक संशयाचे वातावरण निर्माण होईल.
कुंभ:– आलेल्या आर्थिक अडचणीतून वाट काढताना कुटुंबात जोडीदाराची साथ मिळणार नाही. नोकरी व्यवसायातील काम करताना घराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पती-पत्नीत वाद निर्माण होतील.
मीन:– नोकरीतील प्रमोशनच्या बाबतील उगाच घाई करू नका. हातामध्ये असलेली कामे व्यवस्थित होत असल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला. मानसिक शांतीसाठी जोडीदाराबरोबर मनमोकळेपणाने बोलावे लागेल.
|| शुभं-भवतु ||