daily horoscope

शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 11 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ 17.04 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 30.36 पर्यंत व नंतर आर्द्रा.

शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शुक्रवार 11 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ 17.04 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 30.36 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–अती उत्साहामुळे व भरपूर काम केल्यामुळे शारिरीक थकवा येईल. नोकरीच्या ठिकाणी चॅलेंज स्वीकारणारे काम कराल. सहकार्यांना आश्चर्यचकित कराल. 

 

वृषभ:– तुमच्या मनासारखी कामे होऊनही आज तुम्हाला मनावर दडपण  येणार आहे. मुलांच्या लहरीनुसार काम करताना तुम्हाला दमछाक होईल. कुटुंबातील वयस्कर मंडळींची देखभाल करताना दमून जाल. 

 

मिथुन:– कालच्या दिवशी ज्यांची सेवा तुम्ही केली आहे  आज त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा पाहून मनाला समाधान होईल. दगदग व धावपळ कालच्या इतकी होणार आहे किंबहुना थोडी जास्त होईल. आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्या व वेळा पाळा. 

 

कर्क:– मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला समाधान देणाऱ्या व तुमच्या आवडीच्या गोष्टी घडतील. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना अतीव आनंद मिळेल. लहान मुलांना मुलांच्या बाबतीत आवडत्या पण खर्चिक वस्तू आणून द्याव्या लागतील. 

 

सिंह:– अचानक विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागेल. घर किंवा इतर कारणासाठी कर्ज काढत असाल तर जामीनदारला समजावून सांगावे लागेल. तो सहजपणे तयार होणार नाही. 

 

कन्या:– प्रेम प्रकरणात येणाऱे अडथळे पार करण्यासाठी युक्तीचा वापर करावा लागेल. कुटुंबामध्ये मंगल कार्याची चर्चा सुरू होईल घराचे रिन्युएशन करण्याचे विचार पुढे सरकतील. 

 

तूळ:– आपले विचार मानसिक कौशल्य आणि अनुभव आजच्या दिवशी इतरां बरोबर चर्चा करताना कामी येणार आहेत. मित्रमंडळी आणि हाताखालील नोकरवर्ग यांच्याबरोबर चांगला रेपो जमेल आणि कामाचा रिझल्ट चांगला मिळेल. 

 

वृश्र्चिक :–कोणत्याही प्रकारचे कर्ज काढत असाल तर आज कागदपत्रे भरू नका, खात्रीने लिहिताना चुका कराल. कुटुंबातील वादावादी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

 

 धनु:– नोकरीतील मंडळीना येणार्या प्रमोशनचा सुगावा लागेल. आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला  लाभ होईल. आजच्या दिवशी नव्या नवनव्या गोष्टींवर कुटुंबात चर्चा होईल. 

 

मकर:– हातातील कामाचा परिणाम इतका होईल की पती-पत्नींचे कडून काही गोष्टीत एकवाक्यता होऊन काम पुढे सरकत राहतील. लहान मुलांना उलटी किंवा जुलाब इत्यादी त्रास संभवतो. 

 

कुंभ:– ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे  असे लोक तुमच्या कार्यात आपण होऊन सहभागी होतील. आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज जिवाचे रान करणार आहात. एखाद्या वेळेस एक पाऊल मागे यावे लागेल. 

 

मीन:– व्यवसायात नियमांचे बंधन पाळणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होईल. ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून  अविवाहितांना विवाहाची संधी मिळेल. कुटुंबातील अडीअडचणींवर गुरूकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. वडिलधार्‍या व्यक्तींचा सल्ला मान्य करावा लागेल.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *