Read in
गुरूवार 10 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 10 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 27.30 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.
गुरूवार 10 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
गुरूवार 10 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 27.30 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– उच्च शिक्षणाचा विचार करत असाल तर तज्ञांच्या सल्ल्याने परदेशी जाण्याचा विचार केल्यास तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अडचणीतून वाट काढताना काय करावे याबाबतचे मानसिक द्वंद्व निर्माण होईल तरी सल्ला आवश्यक आहे.
वृषभ :–अपेक्षित नोकरीच्या बाबतीत तुमच्या इच्छेनुसार उत्तर येणार नाही. कामाच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्याबाबतीत संशयाचे वातावरण निर्माण होईल. कोणतेही वाहन चालवत असाल तरी वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.
मिथुन:– गुंतवणुकीबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या लोभाला बळी पडू नका. आज तुम्हाला आर्थिक लाभ होणार नसल्याने पैशाचा व्यवहार करू नका. पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्क:– तुमच्या हातात असलेल्या प्रोजेक्ट बाबतचे तुमचे विचार वरिष्ठांकडून मान्य केले जातील. तसेच सहकार्यां समोर मांडण्याची परवानगी मिळेल. तुमचे कौशल्य व अनुभव आज तुमचा सन्मान वाढवेल.
सिंह:– ज्या कामाची आजपर्यंत भीती वाटत होती तेच काम आज तुमच्या वाटणीला येणार आहे. नोकरीतील सहकारी तुम्हाला पुरेपूर मदत करतील. कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
कन्या:– तुमच्यावर नाराज असलेल्या व्यक्तींपासून आज फारच सावध रहावे लागेल. मानापमानाच्या नाटकांमध्ये अडकून पडू नका. सरळ विचाराने समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ घ्या म्हणजे मानसिक त्रास होणार नाही.
तूळ:– आज व्यवसायाच्या कामात भागीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. ज्यांचा आधार वाटत होता त्यांच्याकडून आज कोणतीही मदत मिळणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सल्ला घ्यावा.
वृश्चिक:– हातातील संधीचा आज तुम्हाला सहजपणे फायदा घेता येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची खात्री वाटेल. तरूण वर्गास आज उत्साह वाढल्याने कामे भरपूर होतील.
धनु:– कालच्या कामातील आकडे प्रथम लक्ष देऊन पुढील कामास सुरुवात करा. झोप नीट न झाल्याने आज कामात उत्साह वाटणार नाही. पोट दुखी व डोकेदुखीचा त्रास जाणवेल. मित्रमंडळींच्या विचाराने काहीही ठरवू नका.
मकर:– आजच्या दिवसात जेवढे काम करता येईल त्या सर्वाचा तुम्हाला लाभ होणार आहे. लक्ष्मी प्राप्तीचे ही चांगले योग असल्याने गुंतवणुकीच्या क्षेत्रात तज्ञांच्या सल्ल्याने काम करा. नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर नक्कीच शोध घ्या.
कुंभ:– आतापर्यंत ठरवलेल्या कामात आलेल्या अडचणींचा विचार करून काम पुढे सरकवता येणार आहे. मागील चुकांच्या विचाराने हताश न होता कामाला सुरुवात करा. अडचणींवर मार्ग सापडून गुरूकडून योग्य मार्गदर्शन मिळेल.
मीन:– व्यवसायामध्ये कर्ज काढण्यासाठी पार्टनर कडून संमती मिळणार नाही. तरी आज तसा प्रस्ताव करू नका. जमीन, घर खरेदी बाबतचे व्यवहार यांचा विचार करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याबाबत सुधारणा होऊन उत्साह वाढेल.
|| शुभं-भवतु ||