daily horoscope

बुधवार 9 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य.

Read in

बुधवार 9 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य.

बुधवार 9 फेब्रुवारी 2022 आज चंद्र रास वृषभ दिवस-रात्र व नंतरही वृषभ आहे.

बुधवार 9 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य. 

कृष्णमुर्ती पद्धतीने देत आहे. 

बुधवार 9 फेब्रुवारी 2022 आज चंद्र रास वृषभ दिवस-रात्र व नंतरही वृषभ आहे. चंद्रनक्षत्र कृतिका 24.22 पर्यंत व नंतर रोहिणी. वरील राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 ग्रहस्थिती नुसार आजच्या दिवसाचे कृष्णमूर्ती पद्धतीने राशिभविष्य देत आहे. 

 मेष :– आजच्या दिवशी सकाळपासूनच कामाची घाई गडबड होणार आहे. आजचा दिवस दगदगीचा असल्याने सकाळचा नाश्ता औषधे सर्व वेळेवर घेऊनच दिवसाची सुरुवात करावी. मित्रांसाठी दवाखान्यात तसेच न्यायालयात जावे लागेल. 

 

वृषभ:– बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या गोष्टी करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांना आपल्या छंदा बाबत माहिती घ्यायची आहे किंवा त्याचे शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांनी आजचा दिवस वाया न घालवता काम करावे. पती-पत्नीमधील लहान संवाद दुरावा निर्माण करेल. 

 

मिथुन:– आज तुमच्या हातात आलेल्या संधी हातातून सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नसल्याने सर्वच बाबतीत काळजी घ्यावी व शांततेने राहावे. 

 

कर्क:– आज गुंतवणुकीबाबतचे बरेच पर्याय तुमच्या समोर येतील त्यातील कोणता पर्याय निवडायचा यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. व्यवसायानिमित्त तातडीने प्रवास करावा लागेल. 

 

सिंह:– कुटुंबात लहान मुलांच्या उत्साहाला आवर घालावा लागेल. व्यवसायाच्या बाबतीत  भागीदारा  बरोबर   विनाकारण वादाचे मुद्दे उपस्थित होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत नवीन वाटा सापडतील. 

 

कन्या:– जुन्या परिचयातून नवीन नोकरीचा संदर्भ मिळेल. आपल्या शिक्षणापासून पासून मिळणारी नोकरीचे नोकरी क्षेत्र शक्यतो बदलू नये. अनुभवावर योग्य संधी मिळणार आहे. 

 

तूळ :–अडचणीतून वाट काढताना नवीनच गोष्टींची माहिती मिळेल. आपल्या हातातील मिळणाऱ्या अनेक संधी वापरण्याची हीच वेळ आहे हे लक्षात ठेवून विचार करावा लागेल. तुमच्या व्यक्तीमत्वा मधील खंबीरपणा तुमच्या बाबतचा आदर वाढवेल. 

 

वृश्चिक:– आज अचानक विचित्र व मानसिक त्रास देणाऱ्या घटना सामोरे जावे लागेल. व्यवसायातील किंवा कुटुंबातील गरजेसाठी काढण्यात येणाऱ्या कर्जाबाबतचे कोणतेही काम सकारात्मक होणार नाही तरी नाराज न होता उद्या उमेदीने काम करावे लागेल. 

 

धनु:– एखादी जुनी वास्तू घेण्याकरता मित्रांकडून तुमच्यासमोर प्रस्ताव येईल. नोकरी मधील तुमच्या प्रमोशनच्या बाबत चर्चा कानावर येथील. गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र काहीसा नुकसान करणारा गुंता तयार होईल. 

 

मकर:– प्रेम प्रकरणांमधील एकमेकांबाबतचे विश्वासाचे संबंध बिघडण्याची मोठी शक्यता आहे. आई मुलांमध्ये बोलण्या मधून गैरसमज निर्माण होतील. तरी मुलाने आई बरोबर मोकळेपणाने बोलावे. महिलांना ऍसिडिटीचा त्रास संभवतो. 

 

कुंभ:– तुमच्या  बुद्धी कौशल्यावर खुष होऊन नोकरीत वरिष्ठांची कृपा लाभेल व कौतुक होईल. कामाच्या बाबतीत प्रोजेक्ट च्या बाबतीत तुमच्या कल्पना सहकाऱ्यांच्या समोर व ट्रेनी मुलांसमोर मांडण्याची संधी मिळेल. 

 

मीन:– तुमच्या हातामध्ये असलेल्या कामाचा उत्तम परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होत असल्याचे जाणवेल. नोकरीमध्ये बदलाची अपेक्षा करणाऱ्याने अचानक घाईने कोणताही निर्णय घेऊ नये. शिकणाऱ्या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरी मिळू शकेल. 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *