daily horoscope

मंगळवार 08 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य

Read in

मंगळवार 08 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य

मंगळवार 08 फेब्रुवारी 2022 चंद्ररास मेष 28.08 पर्यंत व नंतर वृषभ.

मंगळवार 08 फेब्रुवारी 2022 दैनिक राशिभविष्य

मंगळवार 08 फेब्रुवारी 2022 चंद्ररास मेष 28.08 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी अहोरात्र व नंतर कृतिका. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

आज भीमाष्टमी व दुर्गाष्टमी आहे.

 

मेष :– कोणतीही महत्त्वाची कामे आजची उद्यावर टाकू नका. इतरांच्या मदतीच्या भरवशावर न राहता आपले आपण कामाला सुरुवात करा.

 

 

वृषभ:– कालपर्यंत वाटणारी प्रकृतीची तक्रार आज अचानक सुधारल्याचे जाणवेल. मित्र-मैत्रिणींबरोबर करावयाचा प्रवास  अचानक रद्द होऊन तुम्हाला बेत बदलावा लागेल.

 

 

मिथुन:– कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीची, मुलांची काळजी  घ्यावी लागेल. पाण्यापासून किंवा पाण्याच्या ठिकाणापासून वयस्कर मंडळीना पाय घसरून पडण्याचा धोका आहे.

 

कर्क:– शॉपिंग करताना आर्थिक व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. प्रत्यक्ष पैसे देताना नोटांवरील आकडे न कळण्याने आर्थिक व्यवहारात गोंधळ निर्माण होईल.

 

 

सिंह:– पायदुखी चा त्रास असणाऱ्या विशेष काळजी घ्यावी लागेल. अत्तरे, उदबत्तीचे इसेन्स, परफ्युम्स यापासून स्किन एलर्जीचा त्रास संभवतो.

 

 

कन्या:– अस्थमाचा त्रास असलेल्याना धूर वा तेलामध्ये तळलेल्या वस्तूंचा वास यामुळे अस्थमाचा त्रास वाढेल. हॉटेलमधील वस्तू खाताना याबाबतचा विचार करावा.

 

 

तूळ:– आर्थिक व्यवहार करताना अतिशय विचार करावा लागणार आहे. चेकची देव देव करताना विश्वासार्हता तपासूनच करा.

 

वृश्चिक:–पाठीचा कणा   व पायदुखीचा त्रास असणाऱ्यांनी कष्टाची कामे करू नयेत. आज जिना चढ-उतार करणे किंवा उभ्याने ओझे उचलणे अशी कामे वयस्कर मंडळींनी टाळावीत.

 

धनु:– कालच्या राहिलेल्या कामाला सुरुवात करताना प्रथम काल पर्यंत केलेल्या कामाचा आढावा घ्यावा लागेल.  बँकेतील कर्मचाऱ्यांनी  आपल्या  कालच्या  नोंदी नीट तपासून पहाव्यात. संगणकावर काम करताना सुद्धा काही गोष्टी डिलीट होत नाहीत ना याची काळजी घ्यावी.

 

मकर:– आज सकाळी उठल्याबरोबर अर्धशिशीची डोकेदुखी कमी झाल्याचे जाणवेल. मोनोपाजच्या स्टेजला असलेल्या महिलांना त्रास कमी होत असल्याचे लक्षात येईल.

 

कुंभ :–वेळेचे बंधन व नियम पाळल्यास काम वेळेवर व वेळेतही करू शकाल. योग्य संधी साधून आपले विचार इतरांना पटवून द्याल.

 

मीन :–वैचारीक पातळीवर बोलताना थोडे हिशोबी रहावे लागेल. कायद्याच्या बाबतीत तुमचा कोणताही हेकेखोरपणा चालणार नाही.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *