Read in
रविवार 06 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 12 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 06 फेब्रुवारी चंद्ररास मीन 17.08 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 17.08 पर्यंत.
रविवार 06 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 12 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
रविवार 06 फेब्रुवारी चंद्ररास मीन 17.08 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 17.08 पर्यंत. सोमवार 07 फेब्रुवारी चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 18.57 पर्यंत व नंतर भरणी. मंगळवार 08 फेब्रुवारी चंद्ररास मेष 28.08 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 21.25 पर्यंत व नंतर कृतिका. बुधवार 09 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 24.22 पर्यंत व नंतर रोहिणी. गुरूवार 10 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 27.30 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. शुक्रवार 11 फेब्रुवारी चंद्ररास वृषभ 17.04 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 30.36 पर्यंत व नंतर आर्द्रा. शनिवार 12 फेब्रुवारी चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा अहोरात्र.
सोमवार रथसप्तमी
मंगळवार भीमाष्टमी, दुर्गाष्टमी.
बुधवार बुधाष्टमी.
शनिवार जया एकादशी.
मेष :–या सप्ताहात बर्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. तुमच्या प्रयत्नांना निसर्गाचीही साथ मिळणार आहे. नोकरीत पगारात वाढ होणे तसेच वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्वाच्या वस्तू कुरियरने कुटुंबातील तरूणांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. पाठवत असाल तर आवश्यक त्या नियमांची पूर्तता करूनच पाठवा. वडीलांकडील नात्यातील आत्या, काका यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणार्या गोष्टी घडतील. संपूर्ण सप्ताहात कोठेही बाहेरच्या प्रवासाचे बेत ठरवू नका.
वृषभ :–मित्रमंडळी व सहकार्यांच्या मदतीने रेंगाळलेल्या कामाला मार्गी लावण्याचे मार्ग सापडतील. हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स केलेल्यांना नवीन व्यवसायाच्या दिशा सापडतील. घरगुती खानावळ किंवा डबे करणार्यांना आपल्या उद्ध्योगाच्या पद्धतीत कांही विशेष बदल करावा लागेल. व्यवसायाच्या विकासासाठी मित्रमंडळींची मदत मिळेल. कलाकार मंडळीना आपल्या कलेचे जाहीर सादरीकरण करता येणार आहे. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता भासेल.
मिथुन :–मनातील महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे मार्ग या सप्ताहात तुम्हाला सापडणार आहेत. कुटुंबात अचानक मुलांकडून मंगलकार्याचे बातमी मिळेल. सामाजिक कार्यातील व्यक्तीना त्यांच्या कामात अनेक अडचणी येत असल्याचे जाणवेल. व्यवसायातील जुनी येणी या स्प्ताहापासून मिळू लागतील. कुटुंबातील पूर्वनियोजित कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. कौटुंबिक मतभेदांवर पडदा टाकण्यास शिकावे लागेल. घाईघाईने कोणतेच आर्थिक व्यवहार करू नका.
कर्क :–विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या तज्ञांकडून शंका सहजपणे दूर होणार आहेत फक्त तज्ञांपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे. व्यवसायातील मागिल सप्ताहात झालेला आर्थिक तोटा या सप्ताहात भरून निघणार आहे. सरकारी परवानग्या, नवीन कान्ट्रँक्टस बाबत कोणावरही अती विश्वासाने आर्थिक देवघेव करू नका. सरकारी योजनांचा अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे. वैयक्तिक पातळीवर करावयाची कामे स्वत: करा.
सिंह :–विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे मार्गदर्शन मिळेल. तज्ञांकडून शिक्षणविषयक नियमबद्ध माहिती घ्या व नंतरच निर्णय घ्या. नोकरीतील हातातील प्रोजेक्टसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. कौटुंबिक कार्यात अचानक तुमच्याच जवळच्या माणसांकडून समस्या निर्माण केली जाईल. मानापमानाच्या कल्पनाना फार महत्व दिल्याने चेष्टेचा विषय होईल.
कन्या :–विवाहाच्या बाबतीत परिचयाला अती महत्व देण्यापेक्षा इतर बाबींचा ही विचार करा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा ओझे वाटल्याने उगाचच भिती निर्माण होईल. भागिदाराच्या विषयावर व्यवस्थित चर्चा न झाल्याने कोणताच निर्णय घेता येणार नाही. नोकरीत गटबाजीपासून सावध रहावे लागेल. वरिष्ठांची मर्जी टिकवणे मात्र तुम्हाला सोपे जाणार आहे. कलाकार, गायक व वादक याना श्रोत्यांकडून चांगली दाद मिळेल.
तूळ :–हातातील प्रोजेक्टवर तुम्हाला अनपेक्षित मोठा खर्च करावा लागेल. व्यावसायिकांनी या सप्ताहात आर्थिक बाबतीत जरा जपून राहावे. महिलांनी आपल्या कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात मोठ्या जबाबदारीने भाग घेतल्यास पुढील अडचणी निर्माण होणार नाहीत. तरूण मुलींनी पूर्ण विचारानेच निर्णय घ्यावेत. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मदतीने नवीन प्रोजेक्टवर चर्चा कराल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर बंधने येणार आहेत.
वृश्र्चिक :–मित्रमंडळातील मतभेदांवर पुन: चर्चा करू नका. तुमच्या मध्यस्थीने वादग्रस्त विषयातून नक्कीच मार्ग निघणार आहे. नोकरीत बर्याच दिवसापासून लांबलेल्या कामाला सुरूवात कराल. गाण्याच्या कार्यक्षेत्रात तुमच्याकडून उत्तम कामगिरी होत असल्याचे जाणवेल. महिलांना अचानक धनलाभाची शक्यता आहे. पूर्वीच्या गुंतवणूकीतून तु ्हाला या सप्ताहात चांगला लाभ होणार आहे. घर, जमीन, शेतीवाडी या बाबतचे व्यवहार मात्र त्रासदायक ठरतील.
धनु :–नोकरीतील अनुकुल वातावरणाचा फायदा घेता येणार आहे. वरिष्ठांच्या मनात तुमच्याविषयी अतिशय चांगली भावना निर्माण होईल. व्यवसायातील भागीदाराच्या चांगुलपणाचा तुम्हाला फायदा होणार आहे. हा सप्ताह तुम्हाला बर्याच पातळीवर लाभदायक राहील. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन झाल्याने तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना आपल्या उत्तम नियोजनाची उपयुक्तता कळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या साइटस् वरून नवीन नोकरीची माहिती मिळेल. विचार करायला हरकत नाही.
मकर :–स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासणार आहे. पूर्वीचे प्रेमप्रकरण नव्याने सुरू होऊन विवाहाच्या दृष्टीने मार्गस्थ होईल. व्यवसायातील प्रगती समाधानकारक राहील. बँकेतील कर्ज प्रकरणाचा मार्गही खुला होईल. नोकरीतील जबाबदारी सांभाळताना तुम्हाला अचानक सहकार्यांकडून दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून खंबीर राहण्याची गरज आहे. घरगुती उध्द्योगात नवनवीन प्रयोग करून पाहण्याची गरज भासेल.
कुंभ :–नोकरी व व्यवसाय या दोन्हीतील अडचणी दूर करण्यासाठी प्रथम तुमच्या मनातील शंकांचे निराकरण करून घ्या. कोणत्याही निर्णयाला येण्यापूर्वी सर्व सकारात्मक – नकारात्मक बाबींचा विचार करा. सरकारी नोकरीतील अधिकाऱ्यांनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीतील कामाबाबत अतिशय जागरूक राहणे महत्वाचे आहे. सामाजिक स्तरावरून तुमच्या विरोधात आवाज उठण्याचा संभव आहे. तरी साभाळनच व्यवहार करावेत.
मीन :–हा सप्ताह तुमच्या बाबतीत मनासारख्या घटना घडवणारा ठरेल. ज्यांना आपल्या राहत्या जागेत बदल करावयाचा आहे त्यांना आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागेल. कुटुंबातील मतभेदांवर मध्यस्थांचा सल्ला उपयोगी ठरेल. सार्वजनिक जीवनातून लोकांकडून त्रास होईल व तुम्ही हातात घेतलेल्या कार्याला विरोध होईल. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असंतुष्ट व्यक्तींना बोलण्याची संधी देऊ नका. तरूणांनी आळस झटकून कामाला लागावे.
|| शुभं-भवतु ||