daily horoscope

शनिवार 05 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 05 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 05 फेब्रुवारी चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 16.07 पर्यंत व नंतर रेवती.

शनिवार 05 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शनिवार 05 फेब्रुवारी चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 16.07 पर्यंत व नंतर रेवती. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

वसंत पंचमी, श्री पंचमी व शांतादुर्गा महोत्सव.

मेष :–कोणतेही निर्णय घेताना तडजोडीची भूमिका घेणे महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मत व्यक्त करता येणार नाही.

 

वृषभ :–तुमच्या परोपकारी वृत्तीचा सर्वानाच अनुभव येईल. मनातील अनुत्तरीत प्रश्नांवर विनाकारण चर्चा करत बसू नका.

 

मिथुन :– आजचा दिवस तुम्हाला कामाचा ताण अतिशय जाणवणार आहे. विवाहेच्छूनी आपल्या अपेक्षांना काहीसा लगाम लावल्यास आजचा दिवस लाभदायक राहील.

 

कर्क :–वादग्रस्त विषयावर चर्चा करताना स्वत:चा हेका न चालवता जरा इतरांचे पण ऐकण्याची तयारी ठेवा. व्यावहारिक प्रश्न सोडवताना भावनेच्या आहारी अडकू नका.

 

सिंह :–नव्याने झालेल्या ओळखीतून आजचा दिवस अतिशय आनंद मिळणार आहे. कोणत्याही संधीचे आज तुम्ही सोने कराल.

 

कन्या :–आज अधिक कष्ट करण्याची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल. परोपकारी वृत्तीमुळे सर्वांमधे आवडते  असल्याची जाणिव होईल.

 

तूळ :–कोणत्याही गोष्टी फार न ताणता त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. युक्तीचा वापर करा व जिंकला.

 

वृश्र्चिक :–वयस्कर मंडळीना अचानक प्रवास करावा लागणार आहे. संपूर्ण विचार केल्याशिवाय आपले मत व्यक्त करू नका.

 

धनु :–नव्या व्यवसायातील आर्थिक विकास करण्यासाठी तुम्हाला तज्ञांची मदत मिळेल. नातेवाईकांकडून नवीन प्रोजेक्ट विषयी विचारणा होईल.

 

मकर :–चिकाटी व प्रयत्न या शब्दांचा अर्थ समजून खर्या अर्थाने वापर करा. कर्तव्यात कोणतीच कसूर सोडणार नाही.

 

कुंभ :–कणखर वृत्ती व ठाम निर्णयामुळे अवघड कामही तितक्याच ताकदीने कराल. युक्तीच्या वापराने अडचणीतून मार्ग काढाल.

 

मीन :–देण्या घेण्याच्या व्यवहारावर जास्त लक्ष द्यावे लागेल. नवीन घरात जाऊ इच्छिणार्यांनी अचानक घाई करू नये.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *