daily horoscope

शुक्रवार 04 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 04 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 04 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ 10.02 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 15.57 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.

शुक्रवार 04 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शुक्रवार 04 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ 10.02 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 15.57 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज विनायक चतुर्थी, श्रीगणेश जयंती. यालाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.

 

मेष :–तुमच्या अडीअडचणींमुळे इतरांना फायदा घेता येणार आहे. हिशेबीपणाने वागल्यास इतरांना हस्तक्षेप करता योणार नाही

 

वृषभ :–यश मिळवण्यासाठी आज तुम्हाला जीवापाड मेहनत करावी लागेल. शत्रू आज तुमच्यासमोर टिकाव धरू शकणार नाही.

 

मिथुन :–आज कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. स्वत:च्या गाडीने प्रवास करणार असाल तर वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल.

 

कर्क :–इतरांच्या अनुभवाचा तुमच्या कामासाठी फायदा करून घेता येणार आहे. नकारात्मक विचारांना जराही थारा देऊ नका.

 

सिंह :–ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्या करण्याच्या फंदात पडू नका. आजच्या अतीमहत्वाच्या कामात मित्रमंडळींचा सल्ला उपयोगी पडेल.

 

कन्या :–आत्मपरीक्षण केल्यास तुम्हाला इतरांबरोबर कसे वागावे याची दिशा मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल.

 

तूळ :–नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आज वातावरण हलकेफुलके ठेवणे जरूरीच आहे. कोणत्याही विषयावर नकारात्मक  चर्चा करू नका.

 

वृश्र्चिक :–आज परिस्थितीनुसार तुमचा विचार बदलावा लागेल. तुमचा हेका चालणार नाही. मान्यवर व्यक्तींचा तुमच्याकडून अपमान होणार नाही याची दखल घ्या.

 

धनु :–परिस्थितीपुढे हार न मानता सकारात्मक दृष्टीने विचार केल्यास हातातील काम निसटून जाणार नाही. स्वत:वर विश्वास ठेवा.

 

मकर :–तुम्हाला आज तुमचे स्वत:चे कौशल्य वापरून व्यवहार करावा लागेल. सरकारी बँकेच्या बाबतीत तुमचे कांहीही चालणार नाही.

 

कुंभ :–महत्वाच्या कामात कोणाच्याही सल्ल्याने त्याच्या आहारी जाऊ नका. सारासार विचार व व्यवहारीपणाने वागावे लागणार आहे.

 

मीन :–कुटुंबात एकमेकांच्या इच्छांचा आदर ठेवा. परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणार्‍यानी प्रथम अनुभवी चा सल्ला घ्यावा.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *