Read in
गुरूवार 03 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 03 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 16.34 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
गुरूवार 03 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
गुरूवार 03 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 16.34 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–इतरांच्या मताबरोबर सहमत व्हायलाच पाहिजे असे नाही तुम्ही तुमच्या मताला ठाम रहा. बोलताना शब्द जपून वापरा.
वृषभ :–मनावर कोणतेच दडपण घेऊ नका. न्यायालयातील कामकाजात आलेला अडथळा दूर करण्याकरीता कोणत्याही प्रकारचा वशिला लावू नका.
मिथुन :–आज आरोग्याबाबत जागरूक रहावे लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अनुभव हाच गुरू ओळखून कामे करा.
कर्क :–तुमच्या निस्वार्थी व उदार मनाने केलेल्या कामासाठी इतरांकडून कौतुक होईल. मनाची अचानक बदलणार्या अवस्थेची जास्त दखल घेऊ नका.
सिंह :–कोणताही आर्थिक व्यवहार करताना अनवधानाने अंगावर जोखीम घ्याल. मनातील गोंधळाचे विचार बाजूला ठेवून स्थिर मनाने विचार करा.
कन्या :–गुप्तशत्रूपासून आज तुम्हाला सावध रहावे लागणार आहे. संपूर्ण विचाराशिवाय आपले मत व्यक्त करू नका.
तूळ :–आज तुम्हाला खुल्या दिलाने ओळख करून घ्यावी लागणार आहे. तुमचा आशावाद येणार्या संकटावर मात करून दाखवेल.
वृश्र्चिक :–पूर्ण विचार केल्याशिवाय आपले मत व्यक्त करू नका. कोणतीही स्पर्धा किंवा कोणतेही धाडस अविचाराने करू नका.
धनु :– मागिल अनुभवावरून आज नक्की से वागावे याचा विचार करा. आपल्या महत्वाकांक्षी धोरणामुळे यश खेचून आणाल.
मकर :–कोणतेही साहस करताना प्रथम येणार्या अडचणींचा विचार करा अन्यथा नुकसान संभवते. प्रत्येक गोष्ट विवेकबुद्धीने हाताळावी लागेल.
कुंभ :–कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवावे लागतील. स्वत:च्या व्यवहाराबाबत अतिशय जागरूक रहावे लागणार आहे.
मीन :–शांत चित्ताने विचार केल्यास हातातील कार्यात आलेल्या अडचणींवर मात करता येणार आहे. कोणत्याही वादविवादात न पडता मौनात रहा.
|| शुभं-भवतु ||