daily horoscope

मंगळवार 01 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 01 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 01 फेब्रुवारी चंद्ररास मकर 30.44 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 19.44 पर्यंत व नंतर धनिष्ठा.

मंगळवार 01 फेब्रुवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

मंगळवार 01 फेब्रुवारी चंद्ररास मकर 30.44 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 19.44 पर्यंत व नंतर धनिष्ठा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–व्यवसायातील कांही व्यवहारांचा त्रास होईल. अचानक पितृसुखाचा लाभ होईल. सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना नकळत झालेल्या चुकीबद्दल मानसिक त्रास होईल.

 

वृषभ :–तुमच्या आराध्य देवतेच्या फोटोची पुजा करताना दैवी शक्तीचा अनुभव येईल. वकिलांच्या बरोबरील सुरू असलेले बोलणे यशस्वी होईल.

 

मिथुन :–गर्भवती महिलांनी आज जास्त दगदग करू नये. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सहमतीने आर्थिक व्यवहारात निर्णय घ्या.

 

कर्क :–डाँक्टर मंडळीना आपल्या कामाच्या दगदगीसमोर स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिले जाणार नाही. नोकरीच्या ठिकाणी आज उत्साह वाढल्याचे जाणवेल.

 

सिंह :–व्यवसायातील अडचणींवर ज्येष्ठांच्या मदतीने अचानक उत्तम उपाय सापडेल. कामगार वर्गासाठी आर्थिक मदत द्यावी लागेल.

 

कन्या :–शिक्षक व प्राध्यापकांना त्यांच्या कामातील कौशल्याबद्धल वरिष्ठांकडून कौतुक होईल. तरूणांकडून अवघड कामास पसंती दिली जाऊन सुरूवातही केली जाईल.

 

तूळ :–मधेच शिक्षण सोडलेल्या व्यक्तीना पुढील शिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यानी विचार करायला हरकत नाही. मोठा ठरलेला प्रवास अचानक खंडीत करावा लागणार आहे.

 

वृश्र्चिक :–शेजारील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. नात्यातील हितशत्रूंचे डावपेच ओळखून घ्या.

 

धनु :–मनाच्या अचानकपणे बदलणार्‍या विचारामुळे मानसिक ताण निर्माण होईल. कुटुंबातील कोणत्याही गोष्टींसाठी मानापमानाची भावना ठेवू नका.

 

मकर:–आज तुम्हाला सामाजिक कार्यात सहभाग घेता येणार आहे. आपली क्षमता ओळखूनच विद्यार्थ्यानी निर्णय घ्यावेत.

 

कुंभ:–नोकरीत सहकारी वर्गाबरोबरच्या मतभेदांना जास्त महत्व देऊ नका. तुमच्या मनातील विचारांना कोंडून ठेवू नका.

 

मीन :–तुमच्या विचारपूर्वक निर्णयाचे वरिष्ठांकडून स्वागत होईल. कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांमुळे बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *