daily horoscope

सोमवार 31 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 31 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 31 जानेवारी चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 21.57 पर्यंत व नंतर उत्तराषाढा

सोमवार 31 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

सोमवार 31 जानेवारी चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 21.57 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज दर्श अमावास्या 14.19 पासून ते मंगळवार 11.16 पर्यंत.

 

मेष :– आज तुमच्या वागण्या, बोलण्यात  तुमच्या वडीलांचा आदर्शवाद

 जाणवेल. शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या कामासाठी तुमच्यावर जबाबदारी

 सोपवली जाईल

 

वृषभ :–विरोधकांचे  डावपेच ओळखता आल्यास पुढील संकटाची चाहूल

 लागेल. शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

मिथुन :–जून्या प्रवासातील ओळखीचा नव्याने परिचय होईल.

 कुटुंबप्रमुखानी मुलांना दिलेला शब्द पाळणे  अतिशय अवघड जाणार आहे.

 

कर्क :–आपल्या तापट स्वभावावर  नियंत्रण न ठेवल्यास नातेसंबंध

 बिघडणार आहेत हे लक्षांत घ्या. नोकरीतही सामोपचाराने वागावे लागेल.

 

सिंह :–राजकीय क्षेत्रातील तुमच्या पदाला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू

च होणार आहेत तरी सावध रहा. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नका.

 

कन्या :–मोठेपणाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी अनाठायी खर्च कराल. महिलांनी

 स्वत:च्या मनातील विचार मोकळेपणाने मांडल्यास मनावरील ओझे कमी होईल.

 

तूळ :–निस्वार्थी वृत्तीने इतरांना मदत करण्याच्या तुमच्या स्वभावाचे सर्वत्र

 कौतुक होईल. घर बदलण्याच्या विचारात अचानक बदल संभवतो.

 

वृश्र्चिक :–स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून काम केल्यास तुमच्या प्रतिष्ठेत

 वाढ होणार आहे. वडिलांकडील नात्याची घरी वर्दळ वाढेल व वातावरण

 आनंददायक राहील

 

धनु :–तुम्हाला इतरांकडून घेण्यापेक्षा देण्याची असलेला आनंदात आज

 भरपूर वाढ होणार आहे. सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून दूर रहा

 

मकर :–आज तुम्हाला कोणीही हातोहात फसवून जाण्याचा धोका आहे तरी

 सावध रहा. सरकारी क्षेत्रातील अर्धवट राहीलेल्या कामासाठी सहकार्‍यांची

 मदत घ्या.

 

कुंभ :–आज तुमच्या समोर घडणार्‍या पण तुम्हाला न पटणार्‍या गोष्टीत लक्ष

 घालू नका. तरूण वर्गाकडून   चिकाटीने अवघड काम करून  दाखवले जाईल

 

मीन :–मित्राच्या घरातील शुभकार्यासाठी धावून जावे लागेल. मनातील

 विचारांचा गोंधळ मानसिक ताण वाढवेल व तो चेहर्‍यावरून कळेल

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *