weekly-horoscope-2020

रविवार  30 जानेवारी 2022 ते शनिवार 05 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी

 Read in

रविवार  30 जानेवारी 2022 ते शनिवार 05 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी

रविवार 30 जानेवारी चंद्ररास धनु 29.45 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 24.22 पर्यंत व नंतर उत्तराषाढा

weekly-horoscope-2020

रविवार  30 जानेवारी 2022 ते शनिवार 05 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

रविवार 30 जानेवारी चंद्ररास धनु 29.45 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 24.22 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. सोमवार 31 जानेवारी 2022 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 21.57 पर्यंत व नंतर श्रवण.  मंगळवार 01 फेब्रुवारी 30.44 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 19.44 धनिष्ठा. बुधवार 02 जानेवारी चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 17.53 पर्यंत व नंतर शततारका. गुरूवार 03 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 16.44 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. शुक्रवार 04 फेब्रुवारी चंद्ररास कुंभ 10.02 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 15.57 व नंतर उत्तरा भाद्रपदा. शनिवार चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 16.07 पर्यंत व नंतर रेवती.

 

रविवार शिवरात्री

सोमवार सोमवती अमावास्या 14.19 पासून ते मंगळवार 11.16 पर्यंत.

शुक्रवार विनायक चतुर्थी, श्रीगणेश जयंती. यालाच तिलकुंद चतुर्थी व वरद चतुर्थी असेही म्हणतात.

शनिवार वसंत पंचमी श्री शांतादुर्गा रथोत्सव.

 

मेष :–स्वेच्छानिवृत्ती घेण्याची इच्छा असलेल्यानी घाई करू नये. सरकारी नोकरदारांच्या अधिकारात अचानक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात आज करावयाचे बदल पूर्ण विचाराने करा. इतरांच्या मताने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक कामात मार्गदर्शक तत्वांचा विचार करा. कोर्ट केस मधील न्याय निवाड्यावर शंका घेत बसू नका.  आतील मनाचा आवाज ऐकून पूर्ण विचाराने वागावे लागेल. अनोळखी व्यक्तीबरोबर तसेच परदेशी असलेल्या ओळखीच्या व्यक्तींबरोबर कोणतेही व्यवहार करू नका. लहान मुलांच्या मांड्या, मांड्यांचे स्नायू याबाबत त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

 

वृषभ:– महिलांना सासुरवाडी कडून सासरकडील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत येणारे अडथळे व अडचणी याबाबत कोणताही कांगावा किंवा उघड चर्चा करू नका. त्यामुळे अडचणी वाढतील. वेदनादायी आजार असलेल्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे लागू नये. भ्रष्टाचार लाचलुचपत इत्यादी बाबतीत तुमचे नाव येणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. जवळच्याच मित्राकडून किंवा ओळखीचं कडून तुम्ही या सप्ताहात फसवले जाणार आहात तरी अती विश्वासाने व्यवहार करू नका. पोलीस खात्यातील मंडळीनी कोणत्याही गुप्त गोष्टींची जाहीर चर्चा करू नये.

 

मिथुन:– नव्याने व्यवसायात प्रवेश केल्याने लगेच फायद्याचा विचार करून मानसिक त्रास करून घेऊ नये. शारीरिक अपंगत्व असलेल्याना या सप्ताहात एखाद्या सरकारी योजनेतून आर्थिक मदत मिळण्याची संधी मिळणार आहे. विम्याची रक्कम किंवा एखादी नुकसान भरपाई मिळाली नसल्यास  त्यासाठी प्रयत्न करावेत. दुसऱ्याच्या असहाय्यतेची कणव येऊन तुमच्याकडून आर्थिक मदत दिली जाईल. सकारात्मक एक दृष्टिकोन असलेल्या ना आपल्या वागण्या बाबत ईश्वरी संकेत असल्याचा अनुभव येईल. दत्त महाराजांच्या उपासकांना आपल्या उपासनेचे फळ मिळत असल्याची सहजपणे सूचक चाहूल लागेल.

 

कर्क:– स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासकांना अतिशय उत्तम  मार्गदर्शकाची भेट होईल. कोर्टकचेरीची कामे कर्ज वसुली ची कामे याची जबाबदारी असलेल्या ना आपल्या कामाचा कंटाळा येईल. वयस्कर मंडळींना पचन संस्थे बाबत त्रास झाल्यामुळे कंबर व ओटीपोट दुखेल. ज्योतिष शास्त्र, आध्यात्मिक शास्त्र  याबाबतच्या अभ्यासकांना अंत:स्फु्र्तीने महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव होईल. प्रवासात इतरांकडून मदत मिळेल. राजकीय मंडळींना त्यांची जनमानसातील प्रतिमा स्वच्छ होत असल्याचे जाणवेल. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींना त्यांच्या या योगदानाबद्दल शाबासकीची थाप मिळेल. वयस्कर मंडळींना अध्यात्मिक क्षेत्रात अभ्यास वाढवण्याची तीव्र इच्छाशक्ती होईल.

 

सिंह :– ज्यांना आपले बँक बॅलन्स तसेच कर्ज याबाबतीतील माहिती कळत नाही अशानी तज्ञांच्या मदतीने नोंद घेणे महत्वाचे राहील. व्यवसायाबाबत महत्त्वाच्या गोष्टी आपल्या एकांगी विचाराने न सोडवता तज्ञांचा सल्ला घ्यावा. पती-पत्नीमधील मतभेद मिटवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्याऐवजी दोघांनी आपापसात चर्चा करून प्रश्न सोडवावेत हा यातील व्यवसायातील यश अपयश याची जबाबदारी भागीदारावर न टाकता स्वतःवरही घेतल्यास भागीदाराचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. कोणताही करार किंवा ठराव करताना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय करू नका. हा सप्ताह तुमच्यासाठी सर्वच बाबतीत बारकाईने काळजी घेण्यास सांगत आहे.

 

कन्या :– मनात कोणत्याही शंका-कुशंका ठेवून व्यवहार करू नका. पुनर्विवाहाचा विचार असलेल्यानी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकल्यास पुढील मार्ग सोपा होईल. कोणत्याही बाबतीत रूढी परंपरा यांचा उगाच बाऊ करू नये चित्रपट नाटक यांच्या  समीक्षकांनी आपले विचार अति स्पष्ट मांडल्याने जनतेकडून चपराक मिळण्याची मोठी शक्यता आहे. लहान मुलांना घेऊन पाण्याच्या ठिकाणी जात असाल तर तर अतिसावध रहावे लागेल महिलांना आपले आयुष्य अचानक रहस्यमय असल्याचे जाणवेल. संततीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना हा सप्ताह आनंद देणारा ठरेल. कलाकार तसेच कलेचे शिक्षण घेणाऱ्यांना आपली कला इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळेल.

 

तूळ :– या सप्ताहात  तुम्हाला अति धाडस किंवा चतुरपणा करता येणार नाही. मानसिक खच्चीकरण झाल्याने दडपण येईल . मित्राच्या आजारपणा करता धावून जावे लागेल तरुण वर्ग आपले वाहन विकण्याच्या विचारापासून परावृत्त होईल. नवीन घर घेण्याचे विचार करत असलेल्यानी लगेचच कोणताही निर्णय घेऊन नये. टेलिफोन वर आलेल्या निरोपावर भरवसा न ठेवता बातमी पडताळून पहावे. लहान मुलाना साथीच्या रोगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे तरी त्याबाबत आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करावी वडिलांच्या बाबतीत  प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

 

वृश्र्चिक :– परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यानी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नुकसान करणारे ठरतील. विद्यार्थ्यांचा विशिष्ट विषय शिकण्याकडे  असलेला कल पाहूनच पुढील तयारी  करावी. घरापासून दूर असलेल्यानी कुटुंबीयांची चौकशी करावी डॉक्टर मंडळींना अचानक एखाद्या मानहानीला सामोरे जावे लागेल. अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीने आपली बोलण्याची पद्धत चुकत नसल्याची खात्री करावी. कुटुंबातील आजारी व्यक्तींसाठी दवाखान्यात धावपळ करावी लागेल. लहान मुलांची स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती चांगली असल्याचे मुलांकडून सिद्ध केले जाईल. गहाण टाकलेल्या दागिन्यासाठी लवकरात लवकर सोडवण्याचा चा प्रयत्न केल्यास पुढील नुकसान टळेल. द्वितीय विवाहाचा विचार करत असाल तर तुर्तास थांबा.

 

धनु :– तुमच्या स्वभावातील अहंपणापाई आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रे दाखले ठेवलेल्या या ठिकाणी सापडणार नाहीत. लहान मुलांना वयस्कर मंडळीना झोपाळ्यावर बसू देऊ नका. खाजगी कंपनीत नोकरी करणार्‍या रिसेप्शनिस्ट, पर्सनल सेक्रेटरी यांनी आपल्या जबाबदारीत तसूभरही कमतरता रहात  नाही ना याची खात्री करावी. श्वसन संस्था, नाक, श्वास नलिका  याबाबत कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी. नोकरी व्यवसायातील अपेक्षित बदलासाठी स्वतःच्या  विचारांपेक्षा तज्ञांचा सल्ला विचारात घ्यावा. जवळच्या नातेसंबंधातील  आलेला दुरावा तुमच्याकडून  दूर होणार आहे तरी प्रयत्न करावा.

 

मकर :– हा सप्ताह अतिशय कष्टाचा असल्याने अजिबात विश्रांती मिळणार नाही तरी कामाचे योग्य नियोजन करावे लागेल. लहान मुलांच्या कपाटा तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी सापडतील.  वयस्कर मंडळींना खांद्यापासून ते हाताच्या बोटांपर्यंत बधीरपणा जाणवेल लेखक व प्रकाशक यांना आपल्या  आवडत्या पुस्तकाच्या या प्रकाशनाची संधी मिळेल.  प्रवासी वाहतूक टॅक्सी बस यासारख्या या वाहनातून या सप्ताहभर प्रवास करू नये.  लहान भावंडाना अति धाडसाचे  प्रयोगासाठी परवानगी देऊ नये. महिलानी घराची स्वच्छता करताना न जमणाऱ्या गोष्टी करू नयेत उंचावरून पडण्याचा धोका आहे.

 

कुंभ :– मैदानावर खेळ खेळणाऱ्या मुलांनी आपल्या उजव्या डोळ्याची काळजी घ्यावी तसेच कोणताही थंड पदार्थ किंवा अस्वच्छ पदार्थ खाण्याने घशाला इन्फेक्‍शन होण्याचा धोका आहे कुटुंबातील नात्यात वैचारिक मतभेदामुळे नात्यातील नात्यात दुरावा येईल तरुणानी बोलताना मर्यादा सांभाळून बोलावे शाळकरी मुलांना यांच्या वक्तृत्वशैली बाबत बक्षीस मिळेल पुरुषाने बँकेतील रोकड रक्कम आणि बँक बॅलन्स दागिने दागदागिने यांचा आढावा घ्यावा. सरकारी नोकरीतील अधिकाऱ्यांनी आपले विचार स्वच्छपणे मांडल्यास कोणतेही आरोप होणार नाहीत. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची राहील वडिलांच्या बाबतीत प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

 

मीन :– व्यवसायातून होणारा धनलाभ अनपेक्षितपणे समाधान देईल. पती-पत्नीच्या एकत्रित व्यवसायात अचानक पणे अडचण निर्माण होईल. सरकारी परवानगी बाबत एखादी नोटीस येण्याची शक्यता आहे, जुन्या घराच्या विक्री बाबत कोणतीही घाई करु नका. ज्या गोष्टी बोलून चर्चेने होणार आहेत त्यातील दिरंगाई मुळे  नुकसान होईल. एकत्र कुटुंबातील व्यक्तीना विभक्त होण्याची घाई, लागेल मनावर ताबा राहणार नाही. लहान भावंडाच्या बाबतीत मनस्ताप देणार्‍या घटना घडतील. ज्या मालमत्तेचे पैशात रूपांतर होईल अशी घाई करू नका वयस्कर मंडळीना पाय दुखीचा पोटऱ्या दुखीचा त्रास  होईल.

II शुभं भवतुII

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *