Read in
शनिवार 29 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 29 जानेवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 26.48 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
शनिवार 29 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 29 जानेवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 26.48 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज शनिप्रदोष असल्याने शिव उपासकांनी शिवाचीउपासना करावी.
मेष :–सामाजिक कार्यातून वाढलेल्या मित्रपरिवाराची भेट होईल. कुटुंबात धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत घ्याल.
वृषभ :–नोकरीतील तुमची जबाबदारी उत्कृष्टपणे पाळत असल्याबद्दल वरीष्ठ खूष होतील. पुढील मिटींगची तयारी करण्याची जबाबदारी आज तुमच्यावर येणार आहे.
मिथुन :–अंगावर आलेली जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही. सामाजिक कार्यात तुम्हाला चांगले यश मिळाल्यामुळे कुटुंबिय खूष होतील.
कर्क :–आज कोणत्याही परिस्थितीत उधार उसनवारीचे व्यवहार करू नका. तुमच्या स्वभावातील रागिटपणा आज उफाळून येईल.
सिंह :–कोर्टकचेरीच्या कामातील अडचणींवर तज्ञांचा सल्ला लागू पडल्याचे आज कळेल. आज तुम्हाला श्री दत्तमहाराजांच्या कृपेचा अनुभव येईल.
कन्या :–आज बोलण्यातील कठोरपणाला कमी केल्यास समोरील व्यक्ती दुखावणार नाही. तुमच्याकडून आज होणारी आर्थिक मदत महत्वाची ठरेल.
तूळ :–मनातील उद्वेगावर जाणून बुजून संयम ठेवा. इतरांना समजून घेतल्यास अवघड कामही सोपे होईल.
वृश्र्चिक :–वाहन चालवताना गतीवर नियंत्रण आवश्यक आहे. नातेवाईकांच्या टीका वर लक्ष देऊ नका.
धनु :–कोणासही आश्वासन देण्यापूर्वी दहा वेळ विचार करा. आजारातून उठलेल्यानी घाईघाईने कामाचा बोजा अंगावर घेऊ नये.
मकर :–आज तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टासाठी नसले तरी नोकरीच्या ठिकाणी जामिन रहावे लागणार आहे. आज तुमची भेट गर्विष्ठ माणसाबरोबर होईल.
कुंभ :–आज आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न कराल. आज व्यसनी मित्रांपासून दूर राहणे पसंत करा.
मीन :–प्रवासाच्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. स्वभावातील ताठपणा कमी करून सेवावृत्तीने वागावे लागेल.
|| शुभं-भवतु ||