Read in
शुक्रवार 28 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 28 जानेवारी चंद्ररास वृश्र्चिक 29.07 पर्यंत व नंतर धनु.
शुक्रवार 28 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शुक्रवार 28 जानेवारी चंद्ररास वृश्र्चिक 29.07 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 29.07 पर्यंत व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुमच्या लेखनकार्यात अचानक बाधा येण्याचा धोका आहे. कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. व्यवहारात प्रगतीपेक्षा वाद होण्याची शक्यता जास्त आहे.
वृषभ :–शेजार्यांबरोबर वादग्रस्त विषयांवर किंवा राजकीय विषयांवरील बोलणे टाळा. तुमच्या अडचणींचा इतर फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन :–आज कांही प्रमाणात तुम्हाला आळस येणार आहे. नात्यातील बिघडलेले संबंध मनापासून सुधारण्याचा आज प्रयत्न केल्यास त्यात चांगले यश येईल.
कर्क :–आज तुम्हाला मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तुमची इमेज चांगली राहील. कुटुंबासाठी आवश्यक तोवढा वेळ द्यावा लागेल.
सिंह :–तुमच्या हट्टी स्वभावाला औषध नसले तरी तुम्हाला आज प्रयत्नाने संयम ठेवावा लागेल. मित्रांच्या विचारांचा पगडा तुमच्या मनावर राहील.
कन्या :–कोर्ट कचेरीचा त्रास होणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या लहरीपणाचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करावे.
तूळ :–आवश्यकतेपेक्षा जास्त व्यवहारी राहिल्यामुळे फायद्याऐवजी नुकसानीची जास्त शक्यता आहे. योग्य नियोजनाचे महत्व पटवून द्या.
वृश्र्चिक :–नात्यातील मुलांच्या शुभकार्यासाठी आर्थिक व इतर प्रकारे मदत करावी लागणार आहे. महिलांनी स्वत:ला झेपतील एवढ्याच जबाबदार्या स्विकाराव्यात.
धनु :- कलाकार मंडळीना आपल्या कलेचे जाहीर प्रदर्शन करता येणार आहे. दैनंदिन जीवनात वेळेचे बंधन पाळा.
मकर :–नियोजित कामात इतरांकडून मुद्धमहून अडथळा निर्माण होईल. कोणतीही जबाबदारी घेण्यापूर्वी बारकाईने विचार करा.
कुंभ :–हातातील कामात येणार्या संभाव्य अडचणींवर आधीच विचार करून ठेवा. तुमच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांचे इतरांकडून कौतुक होईल.
मीन :–सहकार्यांना तुम्ही करत असलेल्या मदतीपेक्षा त्यांना प्रशिक्षणाची मदत आहे हे ओळखा. इतरांच्या क्षमता ओळखून मगच कृती करा.
|| शुभं-भवतु ||