Read in
गुरूवार 27 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 27 जानेवारी चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र विशाखा 08.50 पर्यंत व नंतर अनुराधा.
गुरूवार 27 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
गुरूवार 27 जानेवारी चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र विशाखा 08.50 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजच्या दिवशी प्रवासात, गाडीत चढता उतरता कोणत्याही प्रकारची घाई करू नका. दैनंदिन उपासना करूनच बाहेर पडा.
वृषभ :–सेवानिवृत्ती घेण्याची इच्छा असलेल्यांना तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे. अचानक प्रवास करावा लागणार आहे तरी मानसिक तयारी ठेवा.
मिथुन. :–अनुभव हाच गुरू आहे याचा आज अनुभव येईल. कोर्ट कचेरीच्या कामात समझोता करण्याची इच्छा निर्माण होईल.
कर्क :–तुमच्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणत्याही निर्णयावर येऊ नका. स्त्रीयांच्या दयाळूपणा व हळवेपणात वाढ होईल.
सिंह :–सत्संगाच्या अनुभवाने मन प्रसन्न होईल. सरकारी नोकरीत असलेल्यांनी इतरांची बाजू मांडण्या करीता जीवाचा आटापिटा करू नये.
कन्या :–नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींवर विसंबून राहू नका. राजकीय मंडळीनी विरोधकांचे डावपेच ओळखून वागावे.
तूळ :–शांतपणे विचाराने नियोजन केल्यास ऐनवेळी गोंधळ होणार नाही. सरकारी पदाधिकार्यांबरोबर गाठभेट होऊन सकारात्मक चर्चा होईल.
वृश्र्चिक :–आकर्षक योजनांच्या मोहात ऐकून मोठी रक्कम खर्च कराल. महिलांनी स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा.
धनु :–महिलांना अचानक असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. क्षुल्लक गोष्टींनी कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या.
मकर :–कुटुंबियांना तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे लागेल. राहता येईल तेवढे हिशेबी राहण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :–अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. नवीन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेताना घाई करू नका.
मीन :–वैयक्तिक पातळीवर शांत वृत्तीने राहिल्यास समोरच्या बरोबर संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. स्वत:च्या हिमतीवर विश्वास ठेवा.
|| शुभं-भवतु ||