Read in
बुधवार 26 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 26 जानेवारी 2022 चंद्ररास तूळ 27.11 पर्यंत व नंतर वृश्चिक.
प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा
बुधवार 26 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
बुधवार 26 जानेवारी 2022 चंद्ररास तूळ 27.11 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र स्वाती 10.05 पर्यंत व नंतर विशाखा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज 76 वा प्रजासत्ताक दिन आहे.
मेष :– पुनर्विवाहाच्या विचारात असलेल्यांना ओळखीतून चांगले स्थळ चालून येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
वृषभ :–घरगुती व्यवसायात नवीन गणिते बसवताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कुटुंबातील लहान मुलांच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका.
मिथुन :–वाहन विक्रीच्या बाबतीत बेजबाबदारपणे व्यवहार करू नका. पोटदुखीच्या त्रासावर मनाने औषध घेऊ नका.
कर्क :–घर बांधण्याच्या विषयावर कुटुंबातील सर्वांकडून एकवाक्यता होईल. वाहन खरेदी करण्याचा बेत सध्या रद्ध कराल.
सिंह :–शाळा काँलेजच्या प्रवेशाबाबतची चिंता दूर होईल. सरकारी कामातील गुंता सोडवण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागेल.
कन्या :–कोणत्याही प्रकारच्या लाँटरीमधे गुंतवणूक करू नका. कोर्ट कचेरीच्या कामाविषयी आज कोणताही निर्णय घेऊ नका.
तूळ :–नोकरीतील नव्याने झालेल्या ओळखीतून आनंद मिळेल. नवीन भाडेकरूंच्या अपेक्षेत असाल तर आजच्या दिवशी चौकशीला दाद द्या.
वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना आज मानसन्मानाचा लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांना मार्गदर्शन मिळेल.
धनु :–मंत्रशास्त्राचा अभ्यास करणार्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासेल. नुकत्याच घडलेल्या प्रसंगावर विचार करून व आजच्या अनुभवांवर प्रिय व्यक्तीविषयी आपले मत बनवू नका.
मकर :–हरवलेल्या वस्तूचा फक्त सुगावा लागेल. फँक्टरी वर्कर्सना अचानक पगारात चांगली वाढ मिळणार असल्याचे कळेल.
कुंभ :–संतती विषयी मनातील शंकांचे निराकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे हे लक्षांत घ्या. सेवानिवृत्तीच्या विचारांनी मानसिक टेन्शन येईल.
मीन :–परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी. आजचा दिवस तुम्हाला अतिशय आनंदाचा जाईल.
|| शुभं-भवतु ||