Read in
सोमवार 24 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 25 जानेवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 10.53 पर्यंत व नंतर स्वाती.
मंगळवार 25 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मंगळवार 25 जानेवारी चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 10.53 पर्यंत व नंतर स्वाती. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज कोणत्याही वादविवादात तुमचीच सरशी होणार आहे. तुम्हाला पटलेल्या, समजलेल्या गोष्टी इतरांच्या गळी उतरवाल.
वृषभ :–वैवाहिक जीवनातील अडचणींवर मौन पाळण्यापेक्षा जोडीदाराला योग्य काय ते पटवून देण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. दगदगीचा व कष्टाचा दिवस आहे.
मिथुन :–सिनेमाची आवड असणार्यांना आज उत्तम कलाकृती पाहण्याचा योग आहे. पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी वेळेवर लक्ष देऊन उपाय करावा.
कर्क :–आज तुमचा संबंध लांबच्या नात्यातील वयस्कर मंडळींच्या सेवेसाठी जाणार आहे. घराच्या सुशोभिकरणाचे अचानक मोठा खर्च करण्याची तयारी दाखवाल.
सिंह :– नोकरीच्या कामातूनच लहानशा व्यवसाय निर्माण होत असल्याचे लक्षांत येईल. विवाहिताना संततीबाबतची ओढ मानसिक त्रास देईल.
कन्या :–कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी बँक मँनेजरना भेटण्यासाठी दिवस लाभदायक आहे. लहान मुलांच्या हातातील वस्तूंकडे विशेष लक्ष द्या.
तूळ :–तुमची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचा आज तुम्हाला अनुभव येईल. आज तुम्हाला नेतृत्व गाजवण्याची संधी मिळेल.
वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधकांच्या आरोपाबाबत संघर्ष करावा लागेल. विनाकारण अहंपणाने वागू नका.
धनु :–आवडत्या विषयावरील पुस्तकाच्या प्रकाशाला हजर राहण्याचा योग येईल. वडिल भावंडाबाबतची काळजी सतावेल.
मकर :–वडिलांच्या प्रतिष्ठेमुळे तुमच्या अडलेल्या कामाला इतरांकडून मदत मिळेल. आयुर्वेदिक डाँक्टरना त्यांच्या अभ्यासाबद्दल व कामाबद्दल सन्मान मिळेल.
कुंभ :–अध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूतुल्य व्यक्तीकडून तुमच्या मनातील शंकांचे निराकरण होईल. एखाद्या धर्मग्रंथाबाबत महत्वाची माहिती मिळेल.
मीन :–पतीराजांना पत्नीकडून मोलाची भेट मिळाल्याने सुखावून जातील. नोकरीतील तुमचा कामाचा आवाका पाहून वरिष्ठ खूष होतील.
|| शुभं-भवतु ||