Read in
सोमवार 24 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 24 जानेवारी चंद्ररास कन्या 23:07 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 11:14 पर्यंत व नंतर चित्रा.
सोमवार 24 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 24 जानेवारी चंद्ररास कन्या 23:07 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 11:14 पर्यंत व नंतर चित्रा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–प्रकृतीबाबतची बेफिकीरी कुटुंबातील सर्वानाच मनस्ताप देणारी ठरेल. व्यवसायातील अडचणींवर अचानक कोणतेही निर्णय घेऊ नका.
वृषभ :–विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी स्वत: नियोजनपूर्वक वागावे लागेल. शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
मिथुन :–घराच्या सुशोभिकरणासाठी नव्याने मोठी खरेदी कराल. आजचा दिवस तुम्हाला सर्वच कामात सहकारी वर्ग चांगली मदत करणार आहेत.
कर्क :–तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर हातातील प्रोजेक्टमधे प्रगती करून दाखवाल. ज्योतिषी, खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्यांना आज उत्तम मार्गदर्शन मिळेल.
सिंह :–न्यायालयातील कामकाजासाठी उत्तम वकिलांच्या मदतीची गरज भासेल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरातील वयस्कर मंडळींच्या सल्ल्याचा विचार करावा लागेल.
कन्या :–नवीन घराच्या शोधात असलेल्यांना मनासारखे घर मिळणार असल्याने कुटुंबात आनंद होईल. घरगुती पार्लरच्या व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
तूळ :–कोणत्याही आवडती गोष्ट करताना त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी एकमेकातील विश्वासाला तडा जाणार नाही याची दखल घ्यावी.
वृश्र्चिक :–आज तुम्ही तुमच्या समंजसपणा मुळेच आलेल्या संकटातून बाहेर पडाल. कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका.
धनु :–वाहन चालवताना प्रत्येक नियम काटेकोरपणाने पाळा. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना तक्त्यांचा सल्ला आवश्यक राहील.
मकर :–नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या व्यवहारात हस्तक्षेप करू नका. लोक आपल्याविषयी काय बोलतात याला आज अजिबात महत्व देऊ नका.
कुंभ :–स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून काम पुढे सुरू ठेवा यश तुमचेच आहे. जोडीदाराबरोबर संयमाने वागल्यास एकमेकातील विश्वासात व प्रेमात वाढ होईल.
मीन :–कुटुंबात वादविवाद न करता मिळतेजुळते धोरण ठेवावे लागेल. नोकरीत आपल्या कार्यक्षमतेचा विचार करूनच नवीन जबाबदारी स्विकारावी लागेल.
|| शुभं-भवतु ||