Read in
रविवार 23 जानेवारी 2022 ते शनिवार 29 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 23 जानेवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 11 :08 पर्यंत व नंतर हस्त.
रविवार 23 जानेवारी 2022 ते शनिवार 29 जानेवारी 2022 पर्यंतचे
साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
रविवार 23 जानेवारी चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा
फाल्गुनी 11 :08 पर्यंत व नंतर हस्त. सोमवार 24 चंद्ररास कन्या
23:07 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 11:014 पर्यंत व नंतर
चित्रा. मंगळवार 25 तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 10:53 पर्यंत व
नंतर स्वाती 10:05 पर्यंत व नंतर विशाखा. बुधवार 26 चंद्ररास तूळ
27:11 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 08:50 पर्यंत व नंतर
अनुराधा. गुरूवार 27 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा
31:09 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. शुक्रवार 28 चंद्ररास वृश्र्चिक 29:07 पर्यंत
व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 29:07 पर्यंत व नंतर मूळ. शनिवार 29
चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 26:48 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
25 मंगळवार कालाष्टमी.
26 बुधवार गणराज्य दिन.
29 शनिवार शनिप्रदोष.
मेष :– सप्ताहाच्या सुरुवातीलाच प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती निर्माण होईल. शक्यतो या आठवड्यात निर्णय घेऊ नका. विनाकारण प्रवास करू नका. जोडीदारासोबतचा सुसंवाद वादाचे रुप घेईल. २६ तारखेचा प्रजासत्ताक दिन मात्र संध्याकाळ नंतर सासुरवाडीची काळजी वाढवणारा ठरेल. गुरुकृपेमुळे व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तरून जाल.
वृषभ :– संततीच्या मनासारख्या गोष्टी केल्यामुळे संततीकडून समाधान मिळेल. पूर्ण अभ्यासाने गुंतवणूक करा. सासूरवाडीकडील बातमी काळजी वाढवणारी ठरेल. व्यवसायातील अडचणींवर जाहीर चर्चा न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अवघड विषयातील अडचणी, तज्ज्ञांकडून समजून घ्याव्यात.
मिथुन :– दूर परगावी असलेल्या आईबरोबर आनंददायी वार्तालाप होईल. शेती, जमीन विकत घेण्याच्या विचारात असणाऱ्यांना एखादी संधी चालून येईल. पूर्ण माहितीशिवाय व्यवहार करू नका. शेअर मार्केटमधील गुंतवणूक २५ व २६ तारखेला फलदायी ठरणार आहे. महिलांना मेनोपॉजचा त्रास होईल, त्यांनी दुर्लक्ष करू नये.
कर्क :– प्रवासी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनी या सप्ताहात अति धाडस करू नये. जाहिरातीवर विश्वास ठेवून डिजीटल मार्केटमधून वस्तू खरेदी करताना काळजी घ्या अन्यथा नुकसान सोसावे लागेल. आवडत्या पाळीव प्राण्याचा सहवास मिळेल. प्रेम प्रकरणातील वाद तुम्हाला स्वतःहून मिटवावे लागतील. नोकरीतील कामाचा आनंद मिळेल.
सिंह :– पगारातील मोठी रक्कम प्रवासावर खर्च होईल. या सप्ताहातील कामाचे नियोजन न केल्यास कामे अर्धवट राहतील. लहान भावंडाच्या आजारपणावर पैसे खर्च करावे लागतील. एखादा विषारी किड्याच्या दंशाचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति आत्मविश्वासाने अभ्यासाची दिशा सापडणार नाही. २४ व २५ जानेवारी गुंतवणूक उत्तम दिवस.
कन्या :– या सप्ताहात तुम्हाला मनासारखे जगता येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेले बेत पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ भावंडाचा डोळा तुमच्या पगारावर राहील. व्यवसायिकांनी आपल्या मालाची जाहिरात योग्य प्रकारे केल्यास या सप्ताहात आश्चर्यकारक अनुभव येईल. नवीन घर पाहात असेल तर सध्या थांबा. घाई करू नका.
तूळ :– जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्वतःच्या कल्पनांना वाव द्यावा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. तुमचे ठरलेले प्लान जोडीदाराच्या मूडमुळे विस्कटले जातील. मित्राच्या गरजेसाठी मोठी रक्कम हात उसनी द्यावी लागेल. लहान भावंडांची गळाभेट होईल. कोणत्याही कामातील आततायीपणा काम बिघडवेल.
वृश्चिक :– इतरांच्या वादग्रस्त विषयांवर विचार केल्याशिवाय आपले मत व्यक्त करू नका. अतिदक्ष वृत्तीमुळे नोकरीत प्रभाव पडेल. या सप्ताहात नोकरीतील, व्यवसायातील कष्ट वाढतील पण सहकाऱ्यांकडून मोलाची मदत मिळेल. अविवाहितांना, विवाहच्छुकांना चांगली स्थळे येतील. स्वभावातील अतिव्यवहारीपणामुळे अडचणीत याल.
धनू :– व्यवसायातील अडचणींवर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच गोष्टी मनात ठेवाव्या लागतील. वयस्कर मंडळींना पोटदुखी, अल्सर या कारणाकरिता दवाखान्यात जावे लागेल. जोडीदाराबरोबर अतिप्रेमामुळे वाद निर्माण होईल. निर्णयात द्विधा मनःस्थिती झाल्यास निर्णय घेऊ नका. या सप्ताहात कुणावरही अवलंबून राह नका.
मकर :– मनापासून कितीही शांत राहण्याचा विचार केला तरी कुटुंबात, नोकरीच्या ठिकाणी वा व्यवसायात तुमच्या बोलण्यामुळे वाद निर्माण होणार आहे. आई-वडिलांशी बोलताना जपून बोलावे. अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुले उंचावरून पडण्याचा धोका आहे, त्यांना सांभाळावे. पती-पत्नीत वाद निर्माण होऊन रुसवा वाढेल.
कुंभ :– तुमच्या आदर्शवादाच्या विचारांचे सर्वांकडून कौतुक होईल. शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून आदराची व प्रेमाची गुरुभेट मिळेल. अति झोपाळूंनी झोपण्यावर मर्यादा घालावी. वडिलांबरोबर तात्विक मतभेद होऊन वाद संभवतो. न्यायालयातील तुमचे काम तुमच्या बोलण्यामुळे बिघडणार नाही याची दक्षता घ्या. कोणत्याही कामाचा गवगवा करू नका, शांतपणे काम करा.
मीन :– व्यवसाय, उद्योगात असलेली अडचण सासूरवाडीकडून दूर केली जाईल. सरकारी नोकरदारांनी, अधिकाऱ्यांनी आर्थिक बाबी अतिशय काळजीपूर्वक कराव्या. लाचलुचपतीत अडकण्याची भीती आहे. कुटुंबात एखाद्या धार्मिक पूजेचे आयोजन होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना गुरुंकडून मार्गदर्शन मिळेल. ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा अचानक नवा कार्यक्रम आल्याने नियोजन कोलमडेल.
II शुभं भवतुII