Read in
शनिवार 22 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 22 जानेवारी चंद्ररास सिंह 16:47 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा पूर्वा फाल्गुनी 10:37 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शनिवार 22 जानेवारी चंद्ररास सिंह 16:47 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा पूर्वा फाल्गुनी 10:37 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–परिस्थितीसमोर माघार न घेता आत्मविश्वासाने निर्णय घ्या व पुढे चला. शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल.
वृषभ :–तुनच्या वैयक्तिक विचारांच्या जोरावर तुम्हाला मान मिळेल. कोर्टाच्या कामात नियमबाह्य बाबी होणार नाहीत याची दक्षता घ्या.
मिथुन. :–तुमच्या सेवावृतीमुळे आज तुमच्या नावाला वलय प्राप्त होईल. घराच्या नूतनीकरणाचे वेड डोक्यात गोंधळ घालेल.
कर्क :–आर्थिक व्यवहारातील कायदेशीर बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. हातातील कामाचा गुंता सोडवणे आज शक्य होणार नाही.
सिंह :–नोकरीत आज विनाकारण गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. देवदर्शनानिमित्त लहानशा प्रवास करण्याचे ठरेल.
कन्या :–आज तुम्हाला ठोस निर्णय घेता येणार नाहीत. अंगावर असलेली जबाबदारी टाळता येणार नाही. मानसिक शांतता ठेवा.
तूळ :–वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. मानसिक सकारात्मकता ठेवल्यास नक्कीच चिंता कमी होतील.
वृश्र्चिक :–वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रत्येक गोष्टीत तुमचे नियोजन आवश्यक राहील.
धनु :–आज तुमच्या कडून आईव वडीलांना मोलाची माहिती मिळेल. राग आला तरी त्याचा अतिरेक टाळावा लागेल.
मकर :–नातेवाईकांच्या बोलण्याकडे मुखंयत: दुर्लक्ष करा तरच आजचा दिवस तुम्ही काम करू शकाल.
कुंभ :–स्वत:ला आलेला अनुभव इतरांना आलाच पाहिजे हा अट्टाहास सोडा. आर्थिक स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न करा.
मीन :–अचानक प्रवास करावा लागेल. महत्वाच्या कामात आलेल्या अडचणींवर तुम्हाला स्वत:च्याच हिमतीवर उपाय शोधावा लागेल.
||शुभं-भवतु ||