Read in
शुक्रवार 21 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 21 जानेवारी 2022 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 09:42 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
शुक्रवार 21 जानेवारी 2022 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 09:42 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संकष्ट चतुर्थी असून चंद्रोदय 21: 25( मुंबई)
मेष :–नोकरीतील बदलाची अपेक्षा करणार्यांनी नव्या नोकरीचा शोध थांबवू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घ्यावा.
वृषभ :– पोटाच्या तक्रारीसाठी डाँक्टरांकडे जावे लागेल. मनातील विचारांचा गोंधळ मानसिक ताण वाढवेल.
मिथुन. :–, हातातील प्रोजेक्टमधे सहकार्यांकडून आवश्यक ती मदत मिळवाल. वैयक्तिक जीवनात सांभाळून रहावे लागेल.
कर्क :–हितचिंतकांना आपली अडचण सा, गितल्यास योग्य तो सल्ला मिळेल. भावंडांच्या हस्तक्षेपाने जुन्या बिघडलेल्या परिस्थितीवर तुम्हाला उपाय सापडेल.
सिंह :–सभोवताली घडणार्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. कोर्टातील कामासाठी आवश्यक तेवढा तातडीने वेळ द्यावा लागेल.
कन्या :– कोणावरही अवलंबून राहणे टाळावे लागेल. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. मानापमानाच्या कल्पनाना फार महत्व देऊ नका.
तूळ :–स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. आपल्या कामाचे योग्य नियोजन करा. आजचा दिवस अतिशय आनंदात जाणार आहे.
वृश्र्चिक :–नोकरीत तुमच्या पुढाकाराने इतरांना आर्थिक फायदा होईल. लेखक मंडळीना आपल्या लेखन कार्यात आलेला अडथळा दूर करावा लागेल.
धनु :–आपल्या आचरणातून इतरांचा गैरसमज होणार नसल्याची खात्री करावी लागेल. मान अपमान याला अति महत्व देऊ नका.
मकर :–आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. घरातील पेडींग कामासाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागेल.
कुंभ :–मानसिक उद्रेक होऊ नये यासाठी इतरांच्या कोणत्याही गोष्टीत पडू नका. धार्मिक वातावरणाची ओढ लागेल.
मीन :–शेजार्यांबरोबर न पटलेल्या बाबींवर समझौता करावा लागेल. इतरांवर टीका करताना मनावर संयम राखावा लागेल.
|| शुभं-भवतु ||