Read in
बुधवार 19 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 19 जानेवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आश्लेषा अहोरात्र.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
बुधवार 19 जानेवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आश्लेषा अहोरात्र. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
20 आँगस्ट 2021 पासून मेष राशीत 20 अंश 40 कलांवर वक्री झालेला हर्षल आज मेष राशीत 16 अंश 41 कलांवर मार्गी होत आहे.
मेष :–आजच्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या नवनवीन कल्पना बाबत कांही ठोस निर्णय घेता येणार आहेत. भावंडांच्या मदतीने कामे पार पडतील.
वृषभ :–नोकरीतील नवीन प्रोजेक्टवरील तुमची पकड घट्ट होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका.
मिथुन :–पगारातील पैशावर मुलांचा डोळा राहील व त्यांची मागणी पुरवावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना अचानक प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.
कर्क :–शेजारधर्म पाळताना तुमचे औदार्य सर्वाना दिसून येईल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
सिंह :– वयस्कर मंडळीना व लहान मुलांना कान दुखण्याचा त्रास जाणवेल. स्वत:ची हुषारी सिद्ध करताना इतरांचा अपमान होणार नाही याचा विचार करावा लागेल.
कन्या :–तुमच्या मनातील योजना कल्पेत आणण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वासाने परिस्थितील सामऋे जाल.
तूळ:– श्री दत्तगुरूंची उपासना करणार्यांना दैवी शक्तीचा अनुभव येईल. आज तुम्ही गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत कराल.
वृश्र्चिक :–वैयक्तिक पातळीवर शांत वृत्तीने वागल्यास नंतर पश्चात्ताप करावा लागणार नाही. तुम्हाला आज विचारात सुधारणा करावी लागणार आहे.
धनु :–आज तुमची प्रतिष्ठा व मान वाढवणार्या घटना घडतील. गोड बोलून आईवडीलांकडून आवडती गोष्ट मिळवाल.
मकर :–नोकरीत अचानक मुत्सद्धीपणे वागावे लागेल. कोणतीही गोष्ट जा आत न ताणता समंजसपणे विचार करा.
कुंभ :–कोणत्याही आवडत्या गोष्टीचा अतिरेक करू नका. खाण्या पिण्यावर संयम बाळगावा लागेल. व्यसनापासून दूर रहा.
मीन :–व्यवहारी दृष्टीकोनातून वागल्यास नुकसान टळेल. अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करताना सावधपणा ए करा किंवा पूर्ण चौकशी करा.
||शुभं-भवतु ||