daily horoscope

मंगळवार 18 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 18 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 18 जानेवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 30:41 पर्यंत व नंतर आश्लेषा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

मंगळवार 18 जानेवारी चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 30:41 पर्यंत व नंतर आश्लेषा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– तुम्ही पूर्वी केलेल्या कामाच्या अनुभवाचा मुलांच्या कामातील  अडचणीसाठी उपयोग कराल. आज तुमच्याकडून तुमची कामे एकदम वेळेत होणार आहेत.

 

वृषभ :– खालच्या राहिलेल्या कामासाठी आज ओढून ताणून वेळ काढावा लागेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.

 

मिथुन :–लहान मुलांच्या पायाला दुखापत होण्याचा धोका आहे. तरूण मुलांनी आपल्या वैयक्तिक माहितीबाबतची आवश्यक ती गुप्तता राखावी.

 

कर्क :– आज तुम्हाला तुमच्या अपार कष्टाने  केलेल्या कामातून अपेक्षित यश मिळेल. महिलांकडून इतरांना अचंबित करणार्या घटना घडतील व महिलांचे कौतुक होईल.

 

सिंह :–परदेशी नोकरीचे स्वप्न पाहणार्‍यानी सध्या जून्या काँल्सचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी आपली उद्धीष्टे निश्चित केल्यास या सप्ताहात तुम्हाला योग्य तो मार्ग सापडेल.

 

कन्या :–विवाहेच्छू मुलींनी आलेल्या नवीन प्रस्तावावर  घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. बाजारात गेल्यावर पैशाची पर्स सांभाळावी लागेल.

 

तूळ :–आजच्या कामाची संपूर्ण भिस्त मित्रांवर सोडून द्या. स्वत: अतिरेकीपणाने किंवा जिद्धीने स्वत:च्या मतावर अडून बसू नका.

 

वृश्र्चिक :–कामाच्या घाईगर्दीत आज तुम्हाला स्वत:कडे बघायला जराही वेळ मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन इतरांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागेल.

 

धनु :–स्वत:चे ट्युशन क्लास असलेल्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा गुंतवणूक करू नका.

 

मकर :–अतिरिक्त फँट्स असलेल्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. आजचा दिवस कांहीसा काळजीचा राहील. आपली दैनंदिन औषधे न विसरता  वेळेवर घ्यावीत

 

कुंभ :–व्यवसायातील माहित नसलेल्या खाचाखोचांवर मनातील शंका दूर करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. सूचक स्वप्नाचा अर्थ लावण्याचा ओढून ताणून प्रयत्न करू नका

 

मीन :-प्रकृती अस्वास्थ्यामूळे मानसिक ताण संभवतो. व्यवसायातही अचानक येणार्या अडचणींवर तातडीने एकांगी विचाराने निर्णय घेऊ नका

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *