daily horoscope

सोमवार 17 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 17 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 17 जानेवारी चंद्ररास मिथुन 22:01 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 28:36 पर्यंत व नंतर पुष्य.

 

सोमवार 17 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 17 जानेवारी चंद्ररास मिथुन 22:01 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 28:36 पर्यंत व नंतर पुष्य. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज पौष पौर्णिमा आहे. म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी नवरात्र समाप्ती चा दिवस आहे.

 

मेष :– अचानक नोकरीतील महत्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. जबाबदारी वाढेल. मानसिक ताण वाढेल.

 

वृषभ :–पगारातील मोठी रक्कम मित्रांच्या आर्थिक गरजेकरीता खर्च करावी लागेल. सरकारी बँकेतील कर्मचार्‍यांना कामाचा ताण जाणवेल.

 

मिथुन :–जे काम बोलूनही होत नाही ते काम न बोलता करून दाखवाल. तरूण मुलीना विवाहाबाबतची विचारणा होईल.

 

कर्क :–ज्या वस्तूची अपेक्षा करत आहात त्या वस्तूबाबतच्या बातम्यांमुळे मनात चलबिचल होईल. एकांगी विचाराने निर्णय घेऊ नका.

 

सिंह :–लहान भावंडाकडून मानसिक त्रास संभवतो. घरातील नोकर चाकर यांना आर्थिक मदत द्यावी लागेल.

 

कन्या :– वयस्कर मंडळीना जिन्यावरून किंवा पायर्यांवरुन  पडण्याचा धोका आहे. तरूण मंडळीना अचानक लाभ होईल.

 

तूळ :–तुमच्या मनातील इच्छा तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण केल्या जातील. मित्रमैत्रिणींच्या काँलने आजच्या सकाळची सुरूवात  होईल.

 

वृश्र्चिक :–तरूणांना जुन्या आठवणींमुळे दैनंएदिन गोष्टी करताना भावना आवरणार नाहीत. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून सांभाळणे अवघड जाणार आहे.

 

धनु :–हातातील आर्थिक बाजू भक्कम नसतानाही खोटा आव  आणाल. मुलांना न पटणार्‍या गोष्टी मामाकडून सांगितल्यास मुले पटवून घेतील.

 

मकर :– बँकेचे  नियम अजाणतापणाने पाळले न गेल्यामुळे दंड भरावा लागणार आहे.  घड लेल्या प्रसंगाबाबत विचार केल्या मानसिक ताण येणार नाही.

 

कुंभ :– कामाचे केलेले योग्य नियोजन व कामातील प्रगती यावर तुम्हाला व्याख्यान ~देता येणार आहे.. मुलींना विवाहाचे प्रस्ताव चालून येतील.

 

मीन :– कुटुंबात तुमच्या कडून आईवडीलांना आनंद मिळेल. मित्रांच्या सहकार्यावर तुमचे बेत आखू नका. स्वत:च्या क्षमता ओळखा.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *