weekly-horoscope-2020

रविवार 16 जानेवारी 2022 ते शनिवार 22 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 16 जानेवारी 2022 ते शनिवार 22 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 16, चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 26:08 पर्यंत व नंतर पुनर्वसु.

weekly-horoscope-2020

रविवार 16 जानेवारी 2022 ते शनिवार 22 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

रविवार 16, चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 26:08 पर्यंत व नंतर पुनर्वसु. सोमवार 17, चंद्ररास मिथुन 22:01 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 28:36 पर्यंत व नंतर पुष्य. मंगळवार 18, चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 30:41 पर्यंत व नंतर आश्लेषा. बुधवार १९, चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आश्लेषा अहोरात्र. गुरूवार 20 , चंद्ररास कर्क 20:23 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:23 पर्यंत व नंतर मघा. शुक्रवार 21, चंद्र रास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 09:42 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. शनिवार 22, चंद्र रास शि, ह 16:47 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 10:37 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.

सोमवार शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी नवरात्र समाप्ती.

शुक्रवार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय. 21:25 ( मुंबई.)

मेष :–हा सप्ताह तुम्हाला तुमच्या हातातील प्रोजेक्टमधे प्रगती मिळवून देणारा आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळीना सन्मानाचे योग येतील. तसेच अचानक कौटुंबिक सण समारंभ होऊन सुग्रास भोजन प्राप्ती होणार आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी त्रासदायक वाटत होत्या त्याच गोष्टीतील आनंद व समाधान सापडेल. संपूर्ण सप्ताह सकारात्मक विचारांनी भरलेला राहणार असल्याने नवनवीन कामे किंवा रेंगाळलेल्या कामाना हातात घ्यायला हरकत नाही. तरूणांना व्हायरल तापाचा त्रास होऊन डोकेदुखी वाढेल.

वृषभ :–या सप्ताहात तुम्हाला जनसंपर्कात मान मिळणार आहे. लेखकांना,  कवीना आपल्या कल्पना, विचार कागदावर उतरवता येथील तर कांही ना डिजीटल मार्केटचा फायदा घेऊन प्रसिद्ध करता येतील.  विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विचार किंवा दृष्टीकोन ज्येष्ठांसमोर व्यक्त केल्यास योग्य मार्ग सापडेल. बेकरी प्राँडक्टच्या व्यावसायिकांना या सप्ताहात चांगली आर्थिक प्राप्ती होईल. ऊत्पन्नाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. महिलांना आपल्या पाककलांना प्रसिद्धी देता येणार आहे.

मिथुन :–मनातील इच्छा  पूर्ण करणारा हा सप्ताह अचानक भरपूर आनंद व समाधान देणार आहे. हाताततील पैशाचा उपभोग कुटुंबियांसाठी करता येणार आहे. मुलांच्या इच्छापण पूर्ण कराल. व्यवसायात चांगली प्राप्ती होईल. घरगुती व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागणार आहे. जून्या मित्रमैत्रिणींची भेट होईल. मनातील अनुत्तरीत प्रश्न चर्चेने सोडवता येणार आहेत. कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना स्वत:च्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

कर्क :–व्यावहारिक पातळीवर बोलताना अविचाराने बोलण्याने कामावर परिणाम होईल. कालपरवापर्यंत च्या राहिलेल्या कामाला योग्य मार्गावर आणण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठांकडून खूपच मान मिळेल व कौतुकही होईल. अकारण उधारी उसनवारी करू नका. बँकेच्या व्यवहारात कोणाचीही मदत घेऊ नका व अवलंबूनही राहू नका. स्थावर मिळकतीचे व्यवहार अचानक जमून येतील.

सिंह :–या सप्ताहात आर्थिक प्राप्ती पेक्षा खर्च मात्र भरपूर होणार आहे. अविचाराने व घाईने पैसे खर्च कराल. कुटुंबात जोडीदाराच्या सल्ल्याला मान द्या व विचार करा. व्यसनाच्या बाबतीत अतिशय जागरूक रहावे लागेल. आई वडीलांबरोबर वैयक्तिक प्रश्र्नांची केलेली चर्चा महत्वाची ठरेल. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांनी केलेली कोणत्याही प्रकारची घाई नुकसानीस कारणीभूत ठरेल.

कन्या :–नोकरीत वरिष्ठंकडून दोन गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. महिलांना अध्यात्माची ओढ लागेल व त्याविी कुतूहल  निर्माण होईल. कौटुंबिक वार्षिक अंदाजपत्रक करताना ज्येष्ठांची किंवा तज्ञांची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतीकाम करणार्याना अचानक शेतीतील खर्च वाढेल. मित्रांच्या संगतीने चैनीसाठी भरपूर पैसे खर्च कराल.

तूळ :–जमिनीचा व घराचा रेंगाळलेला व्यवहार या सप्ताहात मार्गी लागेल. राहत्या घराच्या सुशोभीकरणासाठी अविचाराने पैसे खर्च कराल. या सप्ताहात प्राप्ती व खर्च यांचा मेळ बसणार नाही. मुलांच्या इच्छेपुढे तुमचे जराही चालणार नाही. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासेल. नुकत्याच घडलेल्या प्रसंगावर विचार करून पुन: घडू नये म्हणून दक्षता घ्यावी लागेल. नवीन ओळखीत प्रेमाचा ओलावा सापडेल.

वृश्र्चिक :–कोणाच्याही वादविवादामधे कसलाही हस्तक्षेप करू शब्दाने शब्द वाढेल व बाजू तुमच्यावर उलटेल. मनातील शंका दूर करून व्यवहार आकडे पहा. हा सप्ताह तुम्हाला जाणिवपूर्क सकारात्मक रहायला शिकवणार आहे. योग्य नियोजनामुळे आलेल्या प्रसंगातून सहजपणे बाहेर पडाल. चुकीच्या निर्णयावर पुन: विचार करावा लागणार आहे. जून्या निर्णयावर अडून बसू नका.

धनु :–उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला जराही लाभदायक ठरणार नाहीत. सामाजिक पातळीवर काम करणार्यांना एखादे सत्तेचे स्थान मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही कोणत्याही उड्या मारू नका. कामामधे अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. नव्याने झालेल्या ओळखीतून फारसा आनंद मिळणार नाही तरी व्यवहारी वागण्याचा प्रयत्न करा. स्वभावातील हळवेपणात वाढ होईल.

मकर :–स्वभावात हिशोबीपणाने ठेवल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. जागेच्या बाबतीतील व्यवहारात घाई करू नका निर्णयाला चिकटून न राहता फेरविचार करा. एखाद्या युक्तीचा वापर करून पर्स्थितीतून बाहेर पडणे सोपे जाणार आहे. प्रमोशनच्या बाबतीत स्वत पुढाकार घेऊ नका व अती उतावीळ होऊ नका. प्रत्येक प्रश्न तुमच्या सद्सद्बुद्धीने हाताळावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी इतरांच्या संगतीने आपला वेळ व पैसा वाया जावू देऊ नये.

कुंभ :–शेजारच्यांच्या उपयोगी पडावे लागेल वार्षिक मदत करावी लागेल. या सप्ताहात प्रत्येक बाबतीत तुमची परिक्षा आहे तरी सावधानतेने वागावे लागेल. कोणत्याही बाबतीत आहारी जाऊ नका व अतिरेकी आने वागू नका. जागेच्या व्यवहारात नुकसान होण्याचे संकेत मिळतील तरी जागरूक रहा. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करताना कोणाच्याही सल्ल्याने न करता वस्तूस्थितीला तपासून ठरवा. अचानक एखाद्या सामाजिक  कार्यक्रमात मोठा सहभाग घ्याल.

मीन :–आलेल्या समस्या संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. नोकरीच्या संदर्भातील कोणत्याही  माहितीची जाहीर चर्चा करू नका. हा सप्ताह तुमच्यासाठी अचानक एखादे आव्हान समोर आणणारा ठरेल. स्वत: अनुभव घेण्यापेक्षा इतरांच्या अनुभवाच्या विचारातून तुम्हाला कांही गोष्टी ठरवता येणार आहेत. मित्रमंडळींचा सल्ला फायदेशीर होऊ शकतो. परिस्थितीनुसार विचार बदलून मार्ग काढावा लागेल. भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व द्यावे लागेल.

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *