Read in
शुक्रवार 14 जानेवारी व शनिवार 15 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य.
** शुक्रवार 14 जानेवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 20:16 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.
शुक्रवार 14 जानेवारी व शनिवार 15 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज मकरसंक्रांत संक्रमणाचा पुण्यकाल 14:18 पासून 24:56 पर्यंत आहे. म्हणजेच सूर्य दुपारी 02वाजून 28 मिनीटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे.
** शनिवार 15 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
चंद्ररास वृषभ 09:50 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 23:20 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज शनिप्रदोष असून संक्रांत करिदिन आहे.
मेष :– कुटुंबातील लहान मुलांच्या मनाप्रमाणे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करून प्रयत्न कराल. बेरोजगार तरूणांना नवीन काम मिळेल.प्रत्यक्ष भेटीमुळे अडलेले काम पूर्ण होईल. अश्र्विनी व भरणी नक्षत्र असलेल्यांना अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. व तेही लहानसहान नाहीत तर भरपूर लाभ होणार आहे. कृतिका नक्षत्रांच्या व्यक्तीना अगदी मनात नसले तरी अनिच्छेने का होईना प्रवास करावा लागणार आहे. तरी त्यातूनही आनंद घेण्याचा प्रयत्न करा.
वृषभ :–आजची मकर संक्रांती तुमच्याच राशीत होत असून बर्याचश्या गोष्टी तुम्हाला आनंद देणार्या होतील. मनातील योजना कार्यान्वित करण्यासाठी तज्ञांचे मत घ्या त्याचा नक्की उपयोग होईल. तुमच्या राशीतील कृतिका रोहिणी व मृगशिर्ष नक्षत्रांना नक्कीच प्रवास घडणार आहे. ज्याना स्पष्ट अतिस्पष्ट बोलण्याची सवय आहे त्यांच्या बोलण्यातून इतरांना फटकळपणाचा आभास होईल. तरी तुम्हाला तोंडात मध ठेवून बोलावे लागेल.
मिथुन :–आजचा दिवस कांही प्रमाणात कष्टाचा जाणार आहे. कामे रोजचीच पण अडचणी वेगळ्याच अशी परिस्थिती निर्माण होईल. पण अडचणींचा भाऊ न करता कामे मार्गी लावाल हे नक्की. ज्यांचे नक्षत्र मृग आहे त्याना दुसर्यांच्या मदतीसाठी प्रवास करावा लागणार आहे. आर्द्रा व पुनर्वसु नक्षत्रांच्या व्यक्तीना शारिरीक पीडेचा त्रास जाणवेल. तरी मला आज त्रास होतोय ही भावना मनातून काढून टाकून त्या त्रासाचा ही स्विकार करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.
कर्क :–व्यवसाय उद्योगाबाबत लोकांनी दिलेला शब्द पाळत आहेत याचा अनुभव येईल. मित्रमंडळींकडून अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य मिळेल व मानसिक आनंद मिळेल.लहान घरगुती उद्योगात कोणतीच कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्या. पुनर्वसु नक्षत्राचे फक्त चौथे चरण या राशीत येत असल्याने मुळातच प्रकृतीची त्रास असलेल्याना कांही प्रमाणात त्रास होईल. पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या मंडळीनी मात्र मला कांही होत नाहीय असे समजून बेजबाबदारपणे वागू नये. अँसिडीटीचा त्रास होणार आहे.
सिंह :–मनात आले म्हणून केले असे तुम्हाला कोणत्याच बाबतीत करता येणार नाही. शरीर बलदंड असूनही मनाने कमकुवत राहून मानसिक त्रास करून घेऊ नका. तुमच्या कर्मस्थानातूनच सक्रांतीचे संक्रमण होत आहे. तरी तुमच्या हातून घडणार्या प्रत्येक कृतीचे बरेवाईट परिणाम तुम्हाला सोसावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडून कोणीही दुखावणार नाही याची खबरदारी घ्या. मघा, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या वयस्कर मंडळीनी संसर्गजन्य रोगापासून फारच दक्षता घ्यावी. उत्तरा फाल्गुनी वाल्यांनी उगाच कोरडी चिंता करू नये.
कन्या :–यावर्षीची संक्रांत तुम्हाला भाग्योदयाकडे घेऊन जाणारी ठरणार आहे. ज्याचे व्यवसाय उद्योग अडचणीत सापडले आहेत किंवा परिस्थिती वरखाली होत असेल तर तुम्हाला नक्कीच दैवी आशिर्वादाचा लाभ होणार आहे. उत्तरा फाल्गुनीच्या मंडळीना आपल्या धाडसाने आपलि प्रसिद्धी खेचून आणता येणार आहे. इतरांच्या वादात, भांडणात पुढाकार घेऊ नका. हस्त नक्षत्राच्या मंडळीना आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत घेता येणार आहे. तर चित्रा आपल्या व्यवहार कुशलतेने व आकर्षक व्यक्तीने दुसर्यांची मने जिंकता येणार आहेत.
तूळ :–तुमच्या व्यवसायातील तुमच्या कामासाठी जर कांही आर्थिक व्यवहार करावा लागत असेल तर अतिशय जागरूकपणे करा. विरोधक, प्रतिस्पर्धी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत हे लक्षात घ्या. परदेशाबरोबर असलेल्या व्यवसाय उद्योगातील अडचणी दूर करता येणार आहेत पण एकट्याने कांहीही न करता दुसर्यांची मदत घ्यावी लागेल. बार, रेस्टॉरंट, फँन्सी गोष्टींच्या वस्तूंच्या मार्केटमधे मोठा लाभ होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी कुटुंबातील अडचणींवर दगदग होईल. महिलांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. स्वाती नक्षत्राच्या मंडळीना आपल्या चलाखीने व्यवसायातील नवनव्या योजना राबवण्याचे स्वप्न पाहता येणार आहे. याचबरोबर रागीट नातेवाईकांचा रोष ओढवून घेणार आहात. विशाखा नक्षत्राच्या मंडळीनी उत्तम उंची वस्त्रांची खरेदी करून खूष होणार आहात.
वृश्र्चिक :–वैवाहिक जाीवनातील निर्माण झालेल्या अडचणींवर विचाराने तुम्हाला मार्ग शोधता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडीवर सुद्धा ज्येष्ठांच्या व तज्ञांच्या सल्ल्याने महत्वाचे निर्णय घेता येणार आहेत. भावंडांच्या मदतीने किंबहुना त्यांच्यावर सोपवलेली कामे योग्य प्रकारे होत असल्याचे जाणवेल. विशाखा नक्षत्राच्या मंडळीना आपल्या संभाषण कलेमुळे स्वत:चा ठसा उमटवता येणार आहे. प्राध्यापक मंडळी किंवा मोठ्या कंपन्यांच्या डायरेक्टर्सना फार मोठ्या घटनेला सामोरे जावे लागणार आहे. अनुराधा नक्षत्रांच्या व्यक्तींना त्यांच्या परोपकारी स्वभावामुळे मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. एखाद्या पारिवारिक किंवा सामाजिक कार्यक्रमात महत्वाचा सहभाग राहणार आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या मंडळीना मात्र आपला राग आवरावा लागेल अन्यथा वेगळीच आफत येण्याची शक्यता आहे.
धनु :–तुमच्या नोकरीतील असलेल्या त्रासदायक बाबींवर तुम्हाला लक्ष केंद्रीत करता येणार आहे. कुटुंबातील एखाद्या संकटावर तुमच्याकडून उपाय सुचेल. तुमच्या धाडसाचे, निर्णयाचे सर्वांकडून कौतुक होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. तरूणांची चैनी वृत्ती उफाळून येईल. पूर्वाषाढा नक्षत्रांच्या व्यक्तींना आपल्या विद्वत्तेनुसार मानसन्मान मिळेल. आर्थिक उधळपट्टी न करता तुम्हाला तुमचे स्टेटस मेंटेन करता येत असल्याचे दिसेल. उत्तराषाढा व्यक्तीच्या मंडळीना कांही प्रमाणात मानसिक त्रास होईल. त्याच त्याच गोष्टींचा वारंवार विचार केल्याने हा ताण येणार आहे. वयस्कर मंडळीना कंबरदुखीचा त्रास जाणवेल.
मकर :–मुलांच्या शिक्षणातील अडचणींवर नक्की काय करावे लागणार आहे याचा उलगडा होईल. तुमच्या कष्टाळू वृत्तीने जे काम जमणार नाही असे वाटत होते तेच काम आज जमेल असा आत्मविश्वास निर्माण होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या मंडळीना पोटबिघडण्याचा किंवा फूडपाँयझन होण्याचा त्रास सहन करावा लागेल. अनाथाश्रम तसेच हास्पिटलमधील सेवाभावी कर्मचार्यांना अतिशय स्ट्रेसफुल काम करावे लागणार आहे. श्रवण नक्षत्राच्या मंडळीना सामाजिक कार्यात सहभागी होउन उत्तम कार्यशैलीबद्दल सन्मान केला जाईल. सध्या दैनंदिन जीवनातील व्यवहार कांही प्रमाणात कष्टप्रद राहतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षणातील अडचणींवर मार्ग शोधावा लागेल. तरूणांना प्रौढ व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. अचानक अविचाराने वागल्याने आर्थिक नुकसान होईल.
कुंभ :–सेवाभावी कर्मचारी, धार्मिक काम करणारे गुरूजी, ज्येतिषी यांना सामाजिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. तरूणांनी गर्दीच्या गोंधळाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. एखादा आरोप येण्याचा धोका आहे. महिलांनी आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपल्या हातातील काम शांतपणे केल्यास एक पाऊल पुढे सरकता येईल. विलासी वृत्तीत वाढ होऊन व्यसनाचे आकर्षण वाढेल. धनिष्ठा नक्षत्राच्या मंडळीनी कोणाच्याही अंतर्गत भानगडीत पडू नये. वयस्कर असो वा तरूण सर्वानीच आपल्या पायांची काळजी घ्यावी. दुखापत किंवा फ्रँक्चर होण्याचा धोका आहे. शततारका नक्षत्रांच्या व्यक्तींना आपल्या बुलंद आवाजाने एखादी सभा जिंकता येणार आहे. कोणत्याही क्षेत्रातील टेक्निशियन असलात तरी चांगले अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या मंडळीनी स्वत: विषयी कोणत्याही जाहीर वाच्यता करू नये. अंगलट येण्याचा धोका आहे. तुमच्या शंकेखोर स्वभावामुळे हातातील संधी जाणार नाही याची खात्री करून घ्या. तीनही नक्षत्राच्या मंडळीना धनलाभ मात्र चांगला होणार आहे.
मीन :– तुम्ही नेहमीच जाहिरातबाजीला भुलून खरेदीच्या मागे लागून आर्थिक भार सोसता. मित्रपरिवारावर छाप पडल्याने व तुमच्यावर दडपण आल्यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांने वागणे अवघड जाणार आहे. नोकरीतील वरिष्ठांच्या विश्वासामुळे तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या मंडळी लाजर्याबुजर्या स्वभावामुळे व संकोची वृत्तीने स्वत:चे नुकसान करून घेतील. धर्मश्रदाधाळूपणामुळे मनाचा गोंधळ उडेल. उत्तराभाद्रपदाच्या व्यक्तीना आपल्या मित्रपरिवारापढे काहीही सुचणार नाही. सध्याच्या अवघड परिस्थितीवर विजय मिळवूनही मनामध्ये चलबिचलता राहील. अस्थिरोगतज्ञांना चांगली प्रसिद्धी मिळेल. रेवती नक्षत्राच्या मंडळीना सध्याची अडथळ्यांची शर्यत जिंकता आल्याने परमानंद होणार आहे. सुगंधी पदार्थांची व नवीन एखाद्या दागिन्यांची खरेदी कराल.
|| शुभं-भवतु ||