Read in
गुरूवार 13 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 13 जानेवारी चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 17:05 पर्यंत व नंतर रोहिणी.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज पुत्रदा एकादशी असून भोगीचा दिवस आहे.
मेष :–बर्याच दिवसापासून पगारावर अवलंबून असलेल्या गोष्टी करताना अचानक अडचणी निर्माण होणार आहेत. मागिल घटनांवरून आलेल्या अनुभवांचा आढावा घ्या.
वृषभ :–आज महत्वाचे निर्णय घेताना इतरांच्या हस्तक्षेपाने विनाकारण द्विधा मनस्थिती होईल. स्वत:वर विश्वास ठेवून निर्णय घ्या.
मिथुन :–हातातून वाया गेलेली वेळ परत वापरता येत नाही याचा चांगला अनुभव येईल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
कर्क :–आजच्या दिवसातील येणार्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांवर तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून योग्य ते उत्तर असेल. संसतीकडूनही सल्ला घ्यायला हरकत नाही.
सिंह :–तुम्ही रोज जे कार्य करतआहात ते खरच तुमच्या मनापासून करता का याचा विचार करा. इतरांच्या सल्ल्याबरभरच अंतर्मनाचा आवाजही ऐका.
कन्या :–पूर्वापार पद्धतीने चालत आलेल्या चालिरितींनुसार घरात धार्मिक पूजा करण्याचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आईबरोबर मतभेद निर्माण होतील.
तूळ :–सासूरवाडीकडून चौकशीचा निरोप येईल एखादी मौल्यवान भेट येईल. लहानशा प्रवासात नवीन ओळखीमुळे वेळ आनंदात जाईल.
वृश्र्चिक :–पतीपत्नीमधील बर्याच दिवसापासून चाललेली धुसफूस अचानक मैत्रिणींच्या मध्यस्थीने कमी होत असल्याचे जाणवेल. मनासारखे झाल्यामुळे घरात वातावरण आनंदी राहील.
धनु :–प्रकृतीच्या बाबतीत मनात उगीचच शंका निर्माण होतील. नोकरीतही सहकारी आपल्या बाबतीत गाँसिपींग करत असल्याच्या शंका मनात येतील.
मकर :–संततीला आलेल्या शैक्षणिक अडचणींवर तुम्ही तुमच्या चतुराईने मार्ग शोधाल. अडचणी दूर करण्यासाठी मित्रमंडळींची मदत. िळेल.
कुंभ :–कुटुंबातील प्रिय व्यक्तीच्या बाबतीत प्रकृतीची काळजी निर्माण करणारे प्रसंग घडतील. आजपर्यंत इतरांना केलेल्या मदतीचे चांगले फळ मिळेल.
मीन :–सध्या प्रवासाचा विषयही काढू नका. व्यवसायाच्या बाबतीत आवश्यक ती जाहिरात केल्यास योग्य प्रतिसाद मिळेल.
|| शुभं-भवतु ||