daily horoscope

बुधवार 12 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 12 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 12 जानेवारी चंद्ररास मेष 20:44 पर्यंत व नंतर वृषभ.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

बुधवार 12 जानेवारी चंद्ररास मेष 20:44 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 13:58 पर्यंत व नंतर कृतिका. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–घराच्या नूतनीकरणाचे विचार एकमताने मंजूर होईल. जाणकारांच्या सल्ल्याने पुढील नियोजन केल्यास  खर्चाचा बोजा वाढणार नाही.

 

वृषभ :–नवीन वर्षात करावयाच्या गोष्टींसाठी आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास नक्कीच यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठांची  मर्जी सांभाळणे आज अवघड जाईल.

 

मिथुन :–कुटुंबात मुलांच्या मंगलकार्याच्या निमित्ताने  धार्मिक विधी करण्याचे ठरेल. मुलांबरोबर अतिशय स्पष्टपणे बोलून तुमचे विचार व्यक्त करा.

 

कर्क :–तुमच्या बाबतीत आज जे मिळेल त्यावर समाधानी रहावे लागेल. विरोधकांच्या विरोधाला फारसे महत्व देऊ नका व विरोधही करू नका.

 

सिंह :–नवीन मौल्यवान खरेदीच्या वस्तूंसाठी कुटुंबात एकमत होणार नाही. तरूणांना आपले नेहमीचे उद्योग सोडून नवीनच दुसरे काम करावेसे वाटेल.

 

कन्या :–आईसाठी औषधांवर खर्च करावा लागेल. सरकारी बँकेच्या बाबतीत तुमचे कांही फार्म्स चुकले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

 

तूळ :–नातेवाईकांच्या मदतीने व्यवहारातील कामात मोठी मदत होईल. तुम्च्या स्वभावदोषांवर मित्रमैत्रिणींकडून कडक टिका होईल. 

 

वृश्र्चिक:– कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कुटुंबियांची नाराजी वाढेल.  नोकरीत  नव्याने झालेल्या ओळखीने मनस्ताप वाढणार नाही याची दखल घ्या.

 

धनु :–नोकरीच्या ठिकाणी अचानक सहकार्याकडून मदतीचा मोठा ओघ मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तरूणांना आपल्या बुद्धीच्या क्षमता वाढल्याचे जाणवेल.

 

मकर :–उद्धोगधंद्यातील रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी  स्वत:हून प्रयत्न करावे लागतील. वैयक्तिक पातळीवर करावयाची कामे स्वत: करा इतरांवर विसंबून राहू नका.

 

कुंभ :–अनावश्यक खर्चाला आळा घातल्यास आर्थिक ताण येणार नाही. विवाह इच्छूकांना विवाहाच्या बाबतीत अतिशय जागरूकपणे विचार करावा लागेल.

 

मीन :–घरगुती उद्योगाच्या व्यवसायात तुमचे नियोजन योग्य असल्याचे जाणवेल. कुटुंबात अचानक पाहुण्यांचे आगमन होणार आहे.

 

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *