daily horoscope

मंगळवार 11 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 11 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार  11 जानेवारी चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 11:08 पर्यंत व नंतर भरणी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मंगळवार  11 जानेवारी चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 11:08 पर्यंत व नंतर भरणी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– आवडत्या वा प्रिय व्यकंतीजवळ  मनातील विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. भाजीपाला, फळफळावळया व्यवसायातून चांगला नफा होईल.

 

वृषभ :–अचानक तुमच्या हातातील कामात सरकारी नियमांच्या अडचणी उद्भवतील. ई गणेशाच्या उपासनेने आल्या अडचणीतून मार्ग काढणे जमेल.

 

मिथुन :–आज कुलदेवतेचा उपासनेत तुमची तीव्र इच्छाशक्ती वाढेल. महत्वाच्या कामाच्या मागे जराही नकारात्मक विचार आणू नका.

 

कर्क :–किडनीचा त्रास असलेल्यांनी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना आपली उद्धीष्टे सफल करण्याचा मार्ग सापडेल.

 

सिंह :– विचारांपेक्षा आज तुम्हाला कृती करण्याची जास्त गरज आहे. कोणत्याही साध्या सध्या विचारांचे ही विनाकारण प्रेशर घेऊ नका.

 

कन्या :–कोटुंबिक स्वास्थ्याकरीता काय करू व काय नको अशी मानसिक स्थिती राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय काळजी घ्यावी.

 

तूळ :–नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. एकत्र कुटुंबातील भावंडामधील वाद मिटण्याकरीता तुम्हाला तुमचा हेकेखोरपणा कमी करावा लागेल.

 

वृश्र्चिक :–उद्धोगधंद्यातील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल. नोकरीत कामाचा व्यापाबरबर जबाबदारीही वाढ होईल.

 

धनु :– मनातील अभ्यासाची भिती विद्यार्थ्यांनी काढून टाकल्यास अभ्यासात नेटाने गती वाढेल. महिलांचे पारंपरिक विचारांचे प्राबल्य वाढेल. 

 

मकर :–कुटुंबातील मुलांचे प्रश्र्न सोडवताना मानसिक बेचैनी येईल. मंगलकार्याच्या अपेक्षेतील वधुवरांनी योग्य संधी चालून येईल. 

 

कुंभ :–आईवडीलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना आपल्या विषयाच्या विद्यार्थ्यांकपीता वेगळी  पद्धत वापरावी लागेल

 

मीन :–महिलांना आपल्या मनासारखी खरेदी करताना वस्तूची प्रत तपासून घ्यावी लागेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून आज चांगला फायदा होईल

 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *