Read in
सोमवार 10 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 10 जानेवारी चंद्ररास मीन 08:48 पर्यंत व नंतर मेष.
मित्रमैत्रिणींनो
सस्नेह नमस्कार,
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वास्तविक वर्ष सुरू होऊन आठदहा दिवस
होऊनही मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकले नाही. प्रकृती अस्वास्थ्य हे
कारण असले तरी मनाची अवस्था मात्र सतत बेचैन होती. आपण हातात
घेतलेल्या कामात खंड पडतोय की काय अशी भिती वाटत होती. पण
आपणा सर्वांच्या सदिच्छा मुळे व ज्येष्ठांच्या आशिर्वादाने मी पुन्हा
माझ्या कामाला सुरूवात करता आहे. या नविन वर्षात बरेच संकल्प केले
आहेत. तुमच्या समोर वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे. तसेच
सध्याचे हे दैनंदिन भविष्य लवकरच “ यु ट्युब चँनलच्या ” स्वरूपात
करण्याच्या विचारात आहे. आपणासही माझ्याकडून जी माहिती
अपेक्षित असेल ती मी प्रामाणिकपणे लिहिण्याची व आपणापर्यंत
पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. गेले आठ दिवस झालेल्या माझ्या कामातील
खंडाबद्धल क्षमस्व.
अनुराधा
देववाणी नक्षत्रालय
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 10 जानेवारी चंद्ररास मीन 08:48 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 08:48 पर्यंत व नंतर अश्र्विनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. आज दुर्गाष्टमी असून शाकंभरी देवीच्या नवरात्रास प्रारंभ होत आहे.
मेष :–आजच्या दिवशी कांही नुकसानीच्या शक्यता आहेत तरी खरेदी करताना जरा दमानेच प्रवासात, मार्केटमधे किंवा गर्दीच्या ठिकाणी सतर्क रहावे लागेल.
वृषभ :–जुळत आलेल्या कामात कंही प्रमाणात गुंतागुंत निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. कलावंताना आजचा दिवस अतिशय आनंदाचा व समाधानाचा जाणार आहे.
मिथुन :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधकांचा त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी वेळेवर लक्ष देऊन उपाय करावा लागेल.
कर्क :–कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबातील नात्यातील मतभेदांवर तुमच्याकडून मलमपट्टी करण्याची संधी मिळेल.
सिंह :–आज सरकारी प्रत्येक नियम काटेकोरपणाने पाळावा लागेल. कुटुंबात धार्मिक विधी करीता खर्च करावा लागेल. कौटुंबिक आनंद देणारा प्रसंग घडेल.
कन्या :–विरोधकांच्या मनातील कलुषित विचारांकडे लक्ष देऊ नका. राहत्या जागेत वस्तूंची अदलाबदल करून घराचे लुक बदलण्याचा प्रयत्न कराल.
तूळ :–मित्रांकडून उधार उसन्या मोठ्या रकमेची मागणी पुरवणे अवघड होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहवासाने मानसिक आनंद वाढेल.
वृश्र्चिक :–प्रवासात नुकसान होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा. जोडीदाराबरोबर आज मनासारख्या गप्पा होतील.
धनु :–हातात आलेल्या संधी हातातून सुटून जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने नुकसान करून घेऊ नये.
मकर :–तरूणांनी समोर येणारी व्यसने, प्रलोभने टाळावीत. नवीन खरेदीच्या विषयांवर आता नवीन प्रश्न उठतील. गुंतवणूकदारांना नव्याने अर्थलाभ होतील.
कुंभ :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. महिलांना आर्थिक अडचणी येतील पण प्रतिष्ठा टिकून राहील.
मीन :–संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल. लहान सहान अपघातापासून सतर्क रहावे लागणार आहे.
||शुभं-भवतु ||