daily horoscope

सोमवार 03 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 03 जानेवारी 2022 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 03 जानेवारी चंद्ररास धनु 18:52 पर्यंत व नंतर मकर.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

सोमवार 03 जानेवारी चंद्ररास धनु 18:52 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 13:33 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णत: सकारात्मक जाणार आहे. तुमची जी कामे अवघड किंवा रखडलेली आहेत ती पुन: नव्याने सुरू करा.

 

वृषभ :–घराण्याच्या रिती रिवाजाकरीताचे धार्मिक विधी करायचा निर्णय घ्याल. मनातील सद्विचारांवर मात कराल. कोणतेही नकारात्मक निर्णय आज घेऊ नका.

 

मिथुन :–व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असलेल्यांनी दिरंगाई न करता डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारतील.

 

कर्क :– नोकरीतील तुमच्या उत्तम कामगिरी बद्धल तु चे वरिष्ठ, कडून कौतुक होईल. नव्या उमेदीने घराच्या सजावटीची खरेदी कराल.

 

सिंह :–कुटुंबातील तरूणांकडून आनंद देणार्‍या बातम्या मिळतील. महिलांना व्यवसायातील अडचणींवर मित्रमंडळींकडून  उपाय सापडेल.

 

कन्या :–प्रवास कितीही आवश्यक असला तरी आज प्र ास करणे टाळावे लागेल. नवीन घराच्या प्रतिक्षेत  असलेल्यांना  घराची महिती मिळेल.

 

तूळ :–शेअरमार्केटमधे अतिधाडसाने गुंतवणूक करू नका. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील व अभ्यासाचा जोर वाढेल.

 

वृश्र्चिक :– आज मनासारखी खरेदी करता येणार नाही व केलीच तर पैसे वाया गेल्याची खंत वाटेल. तरूणांना चैनीवर पैसा खर्च करावा वाटेल. 

 

धनु :–वाहने काळजीपूर्वक चालवायची आहेत आजचा दिवस कांहीसा दुखापतीचा राहील. विद्यार्थ्यांना आपल्या यशाची खात्री वाढेल. 

 

मकर :–वयस्कर मंडळीनी  आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. व्यवसायात निरनिराळ्या मार्गाने धनलाभ होईल व नव्या आँर्डर्स  मिळतील. 

 

कुंभ :–सामाजिक पातळीवर काम करणार्यांना जनसेवेची उत्तम संधी मिळेल. राहत्या घरातील   सुशोभिकरणासाठी  शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.

 

मीन:–विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासूवृत्तीत वाढ होऊन  तुमचा  झटून अभ्यासाला लागण्याचा आजचा दिवस आहे. व्यवहारात योग्य प्रकारे लक्ष दिल्यास  नुकसान टळेल.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *