Read in
रविवार 02 जानेवारी 2022 ते शनिवार 08 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 02 जानेवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 16:23 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
रविवार 02 जानेवारी 2022 ते शनिवार 08 जानेवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
रविवार 02 जानेवारी चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 16:23 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. सोमवार 03 चंद्ररास धनु 18:52 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 13:33 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा. मंगळवार 04 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 10:56 पर्यंत व नंतर श्रवण. बुधवार 05 चंद्ररास मकर 19:53 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 08:45 पर्यंत व नंतर धनिष्ठा. गुरूवार 06 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 30:20 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. शुक्रवार 07 चंद्ररास कुंभ 24:14 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 30:19 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. शनिवार 08 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 31:09 पर्यंत व नंतर रेवती.
रविवार अमावास्या 24:03 पर्यंत.
गुरूवार 06 विनायक चतुर्थी.
मेष :–सप्ताहाच्या सुरूवातीला सतत उपदेश करणार्या व्यक्तीपासून मानसिक त्रास होईल. तरूण वर्गाला गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल व त्यांच्या मार्गदर्शनामुळे पूजा प्रार्थनेविषयी आकर्षण वाटेल. पुरूष व महिला सर्वानाच हा सप्ताह पितृसुखाचा सहवासाचा जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुम्हालाच अग्रक्रमाने महत्व दिले जाणार असल्याची बातमी कानावर येईल व सुखावून जाल. आईवडीलांच्या प्रेस्टीजमुळे मार्केटमधील तुमचा रूबाब वाढेल.
वृषभ :–या सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे पण लाचलुचपत, भ्रष्टाचार यांपासून सावध रहा. सासुरवाडीकडून अचानक मोठी किमती गिफ्ट मिळणार आहे. राजकीय मंडळीना आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून अतिशय सावध रहावे लागणार आहे. सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळींकडून खूपच कौतुक होणार आहे. मैदानी खेळ खेळणार्या खेळाडूना चांगली संधी मिळणार आहे. कुटुंबात लेख, जावई, सुना नातवंडांनी घर भरून जाईल व घरात आनंदी आनंद होईल.
मिथुन :–या सप्ताहात महिलांनी स्वत:ला अतिशय जपावे. एकटे दुकटे अवेळी बाहेर कजाऊ नये. हा सप्ताह तुम्हाला मनस्ताप देणारा ठरेल. धार्मिक पूजा अर्चा सांगणार्या गुरुजींना या सप्ताहात वेगवेगळ्या कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील भागीदाराच्या मनात काय चाललय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करून नंतरच तु चा प्रस्ताव मांडा. व्यवसाय, नोकरी यातून होणारा धनलाभ आनंद देणारा आहे.
कर्क :–नोकरीच्या बाबतीतील अडचणीचे प्रश्न सहजपणे सुटणार आहेत. बहुरंगी व्यक्तीमत्वाच्या मंडळीना हा सप्ताह अतिशय आनंदात व मनोरंजनात जाणार आहे. कलाकार, गायक यांना तर हा सप्ताह म्हणजे पर्वणीच असणार आहे. प्रसिद्धीपासून लांब राहणार्यांना आपोआप प्रसिद्धी मिळणार आहे. कोणात्याही मैत्रीपूर्ण संबंधांवर लोकांकडून टिका केली जाईल. सामाजिक पातळीवर काम करणार्यांना जनसेवेची उत्तम संधी मिळेल महिलांना आपल्या कुटुंबातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी लागेल.
सिंह :–शाळा काँलेजच्या ग्रूपमधील मित्रांचे महत्वाचे सहकार्य मिळेल. या सप्ताहात कांही वेळा वादाचे प्रसंग येणार आहेत तरी संयम राखणे आवश्यक आहे. वधुवर मंडळांना अतिशय बारकाईने विचारकरूनच काम करावे लागेल. पोलीस खात्यातील अधिकार्यांना गुन्हेगारांकडून चकवा देणार्या गोष्टी घडतील व त्यामुळे मानसिक त्रास होईल. अध्यात्माच्या क्षेत्रात अभ्यास करणार्यांना योग्य मार्गदर्शकाची भेट होईल. आर्थिक व्यवहारात कोणतेही छुपे व्यवहार करू नका.
कन्या :–कितीही टाळायचा प्रयत्न केलात तरी या सप्ताहात तुमचा अँग्रेसिव्हनेस वाढणार आहे. व्यवसाय, कोचिंग क्लासेस, किंवा घरगुती शिकवणीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे जाणवेल. बुद्धीवान मंडळीना आपले विचार व मते इतरांसमोर मांडण्याची संधी मिळेल. एखाद्या वेबिनारमधे बोलण्याची संधी मिळेल. अवघड वाटणार्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगण्याच्या तुमच्या पद्धतीची लोकांकडून वाहवा होईल.
तूळ :–घरातील फिनेल किंवा अशाच त्रासदायक रसायनांपासून मुळा, ना सांभाळावे लागेल व स्वत:च्या डोळ्यांना त्रास व दुखापत होण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्या विषयासाठी योग्य मार्गदर्शकांची सोय होईल अचानक नोकरीतील कामासाठी लहानशा प्रवास करावा लागेल. अध्यात्माच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांचा गौरव करण्यात येईल. महिलांनी मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास फ्रेश वाटेल.
वृश्र्चिक :– नोकरीतील सहकार्यांच्याकडून तुमच्या बाबतीतील असलेल्या तक्रारीकमी होत असल्याचे जाणवेल. वयस्कर मंडळीनी साथीच्या रोगापासून त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. हा सप्ताह प्रकृतीच्या बाबतीत कांहीसा नरम गरम राहील. आर्थिक गुंतवणूकीसाठी मात्र अतिशय लाभदायक राहील. अति खरेदीच्या मोहात अडकून भरपूर पैसे खर्च कराल पण त्यातून आनंद मिळेल.
धनु :–या सप्ताहात पाय मुरगळणे, किंवा फ्रँक्चर होणे अशा घटना घडण्याचा धोका आहे. विवाहीत जोडप्यांना अपत्य प्राप्ती बाबतची गोड बातमी कळेल. नवीन रिकामी जागा खरेदी करण्याचे जूने स्वप्न पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील. हाँटेल, मनोरंजन यात हा सप्ताह तुम्हाला आनंद देणारा ठरेल. धार्मिक पूजा अर्चा सांगणार्या गुरुजींना या सप्ताहात वेगवेगळ्या कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. शाळा काँलेजच्या मुलांना आर्थिक लाभ देणारा उद्योग सापडेल तरी विचारकरावा
मकर :–बहिण भावंडांच्या ओढीखातर अचानक प्रवास करावा लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी काम जास्त करावे लागल्याने या सप्ताहात मानसिक ताण वाढेल. नव्याने कामे अंगावर ओढून घेऊ नका. न्यायालयातील कामकाजात आलेला अडथळा दूर करण्याकरीता वरीष्ठांची मदत मिळेल पण कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा प्रयत्न करू नका. तरूणांच्या उत्साहात व एनर्जीमध्ये अचानक वाढ होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील.
कुंभ :–हाती घेतलेल्या कामात आपले काय चुकत आहे हे शोधून काढा. कंटाळा केल्यास मोठे नुकसान संभवते. मित्रमंडळींच्या सहवासाने व सहकार्याने नोकरीतील रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.महिलांनी आपल्या जवळच्या नात्याशिवाय इतर कोणाशीही मनातील दुख बोलून दाखवू नये. लहान मुलांच्या कडून महत्वाची व मौल्यवान वस्तू हरवली जाण्याचा धोका आहे.
मीन :–कौटुंबिक समस्या सामंजस्याने सोडवाव्या लागतील. स्वत:चा हट्ट चालवल्या विनाकारण मनस्ताप होऊन नुकसानही होणार आहे. नोकरीतील हा सप्ताह तुमची परिक्षा घेणारा ठरेल. मित्राच्या आईसाठी आर्थिक मदत करावी लागेल. तरूणांच्या बाबतीत मनाविरुद्ध घडणार्या गोष्टींमुळे ब्लडप्रेशर वाढण्याचा धोका आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले जवळचे व प्रतिस्पर्धी यातील फरक ओळखूनच वागावे. सार्वजनिक कामात कोठेही मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
||शुभं-भवतु ||