daily horoscope

शुक्रवार 31 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 31 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 31 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 22:04 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.

शुक्रवार 31 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शुक्रवार 31 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 22:04 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज प्रदोष असल्याने शिव उपासकांनी उपासना  करावी.

मेष :– कांहीही होत नसताना आजारी असल्याची ज्यांना भावना आहे त्यांच्या आजाराच्या  स्वरूपाचे योग्य निदान होईल. कुटुंबातील भावाबहिणींच्या नात्यातील वाद संपत असल्याचे लक्षांत येईल.

 

वृषभ :–मोनोपाँजचा त्रास असलेल्या महिलांच्या ओटीपोटात दुखण्याचा त्रास होईल. महत्वाच्या वस्तूंची चोरी होण्याचा धोका आहे. द्वितीय संततीकडून आनंदाची बातमी कळेल.

 

मिथुन :–कामगार वर्गाला कामाचा ताण वाढणार आहे. एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे निर्णय घेता येणार आहेत. भावंडांच्या मदतीने कामे पार पडतील.

 

कर्क :–प्रेम विवाहाबाबतची सर्वांना खुष करणारी बातमी द्याल. काव्य लेखन, वाचन  करणार्यांना  वाचकांकडून शाबासकीची थाप मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल.

 

सिंह :–सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनाकरीता तुम्हाला सन्मानाने  बोलावले जाईल. कलाकार व चित्रकार मंडळीना त्यांच्या कलेसाठी  सन्मानित केले जाईल.

 

कन्या :–नोकरीत  आवडत्या क्षेत्रातील नोकरीची संधी मिळण्याच्या संधी निर्माण होतील. बदलत्या हवामानाचा वयस्कर मंडळींच्या प्रकृतीवर परिणाम होईल.

 

तूळ :–साठवलेल्या तसेच राखीव पैशाचा वापर आज तुम्हाला मित्रमंडळींसाठी करावा लागणार आहे. कालच्याप्रमाणेच आजही कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे.

 

वृश्र्चिक :–दुसर्यांच्या मनातील शंकांचे निरसन करताना समजेपर्यंत सांगावे लागेल. विद्यार्थ्यांनी  आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून  काम केल्यास  नक्कीच यश मिळेल.

 

धनु :–कुटुंबात तुमच्या कडून आईवडीलांना आनंद मिळेल. व्यवसायातील विकासासाठी आखलेल्या योजनांमधे  अडचणी निर्माण झाल्याचे जाणवेल.

 

मकर :–जवळच्या मित्रांच्या मनातील विचार आज तुम्हाला ओळखता येणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाबरोबर व्यवसायाच्या बाबतीत मोठा विचार करता येणार आहे.

 

कुंभ :–एकत्र नातेवाईकांच्या सहवासात  स्वत:विषयीचा  मोठेपणा मिरवता येणार आहे. कायदेशीर बाबतीतील कागदपत्रे हरवणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

 

मीन :–कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अचानक तुमच्या अंगावर आलेली जबाबदारी  तुम्हाला टाळता येणार नाही. तुमच्या हातातील कामात कोणतीही तृटी राहणार नाही याची दखल घ्यावी लागेल.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *