Read in
गुरूवार 30 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 30 डिसेंबर चंद्ररास तूळ19:07 पर्यंत व नंतर वृश्चिक.
गुरूवार 30 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
गुरूवार 30 डिसेंबर चंद्ररास तूळ19:07 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 24:33 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज सफला एकादशी आहे.
मेष :–आज बोलण्यावर संयम राखावा लागेल. मनात कोणताही राग नसूनही बोलताना समोरच्याला त्रास होईल असे बोलणे होईल. नोकरीत सहकार्यांना न दुखावता त्याच्या जबाबदारी बाबत सांगावे लागणार आहे.
वृषभ :–तुमच्या महत्त्वाकांक्षेमुळे हातातील कामाला यश येत असल्याचे जाणवेल. समोर उभ्या असलेल्या संकटावर सुद्धा तुमच्या विवेकी धोरणामुळे मात कराल.
मिथुन :–कोणाच्याही वादविवादामधे कसलाही हस्तक्षेप करू नका. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास यशाची खात्री वाटेल व मानसिक समाधान मिळेल.
कर्क :–शेजारच्यांसाठी अचानक वैद्यकीय मदतीसाठी धावाधाव करावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात जराही घाईगडबड न करता शिक्षकांच्या सल्ल्याने अभ्यास करावा.
सिंह :–ताणतणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही केलेल्या निश्चयाला महत्व द्यावे. भावनेच्या भरात बोलताना समोरील व्यक्ती दुखावणार नाही याची दखल घ्यावी लागेल.
कन्या :–समोरील व्यक्ती आज तुमच्या पुढे अतिशय घमेंडीने वागणार आहे तुमचा शांतपणा सर्वांच्या नजरेत भरेल व तुमची प्रतिष्ठा वाढेल.
तूळ :–आयुष्यात दगदग व संघर्ष यामधूनच यशाचा मार्ग सापडतो ही गोष्ट इतरांना पटवून द्याल. सारासार विवेक बुद्धीने वावरताना तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल.
वृश्र्चिक :–अनोळखी लोकांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेऊ नका. न्यायालयातील कामकाजात आलेला अडथळा दूर करण्याकरीता कोणत्याही प्रकारचा वशिला लाञू नका.
धनु :–कुटुंबात तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी बाबतच्या चर्चा, विचक्षणा करत बसू नका. मनमोकळेपणाने बोलून विषयातील गंभीरपणा दूर करता येणार आहे.
मकर :–आज अचानक एखाद्या सद्विचारांच्या व्यक्तीची भेट होऊन तुमच्या मनातील शंकांचे निरसन होईल. सरकारी नोकरदारांना हुकुमशाही प्रवृत्ती समोर झुकावे लागेल.
कुंभ :–स्वभावातील लहरीपणात अचानक वाढ झाल्याचे जाणवेल. कोणतेही स्वत:चे किंवा दुसर्याचे घाम करताना थोडेतरी व्यवहारी राहिलात तर तुमचे नुकसान होणार नाही.
मीन :– तुमची वैचारिक भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन केल्यास खात्रीने कामे आटोक्यात येतील.
||शुभं-भवतु ||