Read in
बुधवार 29 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 29 डिसेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
बुधवार 29 डिसेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 26:38 पर्यंत व नंतर विशाखा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आज कोणत्याही परिस्थितीत नियोजित नव्या कामाला सुरूवात करता येणार आहे. वयस्करांच्या मनातील लहान मुलाची वृत्ती जागी होईल.
वृषभ :–वैयक्तिक पातळीवर शांत वृत्तीने राहिल्यास समोरच्या बरोबर संबंध बिघडणार नाहीत. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सहवासात रहाल.
मिथुन :–विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वास वाढ होण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत. आज तुम्हाला साथीच्या व संसर्गजन्य रोगापासून काळजी घ्यावी लागणार आहे.
कर्क :–अविवाहितांना विवाहासाठी आलेल्या स्थळांची सखोल चौकशी करा कांही गुप्त गोष्टी असतील. शब्दाने शब्द न वाढवता संयमाने वागावे लागेल. नवीन परिचयातून आनंद मिळेल.
सिंह :–घडलेल्या प्रसंगातून आत्मचिंतन केल्यास पुढील मनस्ताप होणार नाही. कुटुंबियांना आपलेसे करून व्यवहार केल्यास त्यातूनही समाधान मिळेल.
कन्या :–जुने वाद नव्याने उकरले जात असतील तर गोड बोलून मिटवण्याचा प्रयत्न करा. नियोजन व तुमच्या हातातील अधिकार यांच्या ताकती रच निम्मे काम यशस्वी कराल.
तूळ :–मनावर आलेले दडपण कमी करण्यासाठी आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहावे. विचार, नियोजन व तुमचे प्रयत्न यांनी कोणत्याही कठीण कामातही यश मिळवाल.
वृश्र्चिक :–नोकरीत सहकारी वर्गाबरोबर असलेले मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. वेळ व पैसे फुकट जाणार नाहीत याचा विचार करा.
धनु :–नोकरीतील नव्या आव्हानास आत्मविश्वासाने सामोरे जाल. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवूनच कामाला सुरूवात करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका.
मकर :–सत्संगाच्या अनुभवाने मानसिक आनंद मिळेल. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका. कोर्टाच्या कामात तुमच्याकडून समझोत्याची भाषा फायदेशीर ठरेल.
कुंभ :–कोणत्याही प्रकारे व्यसनापासून दूर रहा अचानक शारिरीक दुखापतीचा धोका आहे. तुमच्या स्वभावातील विक्षिप्तपणा वाढ होईल.
मीन :–वादविवाद, कलह यांपासून दूर रहा. मनातील विचार व्यक्त करण्याकरीता योग्य संधीची वाट बघत बसू नका. मनमोकळेपणाने बोलून टाका. मित्रमंडळींच्या आहारी जाऊ नका.
||शुभं-भवतु ||