Read in
मंगळवार 28 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 28 डिसेंबर चंद्ररास कन्या 16:46 पर्यंत व नंतर तूळ.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मंगळवार 28 डिसेंबर चंद्ररास कन्या 16:46 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 28:10 पर्यंत व नंतर स्वाती. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नेहमीच्या कामातून वेळ काढून आज तुमच्या मनातील व बर्याच काळापासून रेंगाळलेल्या कामाला वेळ देता येईल. हरवलेल्या वस्तूंचा अचानक शोध लागेल.
वृषभ :–मुलांच्या सहवासात आजचा दिवस अतिशय आनंदात जाणार आहे. भावूक होऊन मुलांच्या डिमांड पूर्ण करण्यासाठी अचानक खर्च वाढेल.
मिथुन :–लहानशा प्रवासात आज मिळणारा सहवास मैत्रीत रूपांतर करेल. औषधांच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याने डाँक्टरांकडे जावे लागेल.
कर्क :–सकाळपासूनच्या धावपळीत सुद्धा महत्वाच्या कामासाठी वेळ देता येणार आहे फक्त योग्य नियोजनाची गरज आहे. सामाजिक कामातील तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल.
सिंह :–नात्यातील दुरावा कमी करण्यासाठीचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला नक्की काय अडचणी आहेत याचा आढावा घ्यावा.
कन्या :–महत्वाच्या काचेच्या वस्तू काळजीपूर्वक सांभाळा आज तुमच्या हातून नुकसान होईल. बाजारात जाताना मोजके पैसे नेऊ नका आवडत्या वस्तूचा मोह आवरणार नाही.
तूळ :–नोकरीतील दैनंदिन कामापेक्षा महत्वाच्या कामाला वेळ द्यावा लागेल. अधिकार्यांबरोबरची मिटींगमधे तुमच्या विचारांना मंजूर केले जाणार नाही.
वृश्र्चिक :– पायांच्या दुखण्यासाठी आता सारखे डाँक्टर बदलण्याचे विचार करू नका. बँकेच्या कर्जाच्या व्यवहारात आता परत नव्या अडचणी निर्माण होतील.
धनु :– कुटुंबातील आवडत्या व्यक्तीच्या समाधानासाठी धडपड करावी लागेल. लहान मुलांच्या हातातील वस्तूंकडे विशेष लक्ष द्या, दुखापत होण्याचा धोका आहे.
मकर :– खालच्या राहिलेल्या कामाला प्रथम प्राधान्याने सुरूवात करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका.
कुंभ :– राखीव ठेवलेल्या पैशांचा वापर मित्रमंडळींच्या मदतीसाठी करावा लागणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी कळतील.
मीन :– पाण्यापासून आज विशेष काळजी घ्यावी लागेल पाय घसरून पडण्याचा धोका आहे. . तरूण मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये
||शुभं-भवतु ||