daily horoscope

सोमवार 27 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  27  डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 27  डिसेंबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:41 पर्यंत व नंतर हस्त.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

सोमवार 27  डिसेंबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:41 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–प्रकृतीच्या बाबतीत मनात कोणतीही शंका घेऊ नका, मानसिक विचारानेच स्वास्थ्य बिघडेल. व्यवसायातील  अडचणीत तुमच्याच हलगर्जीपणामुळे कांही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसेल. 

 

वृषभ :–संततीच्या बाबतीतील तुमचे नियोजन डाँक्टरांच्या सल्ल्यानेच करावे लागेल. अजोळकडील नात्यातील मंडळींच्या मदतीने एखाद्या गूढ गोष्टींचा उलगडा होईल. 

 

मिथुन :–आईच्या आनंदाकरीता  तुमच्याकडून  नवनवीन गोष्टींची खरेदी होईल. पाळीव प्राणी किंवा एखाद्या किडा मुंगी पासून जख म होण्याचा धोका आहे. 

 

कर्क :– व्यवसायानिमित्त लहानशा प्रवास करावा लागणार आहे.  कोणत्याही प्रकारची घाई तुमचे आर्थिक नुकसान करेल. अविचाराने व घाईने पैसे खर्च कराल. 

 

 सिंह :–आजचा दिवस तुमच्यासाठी धनलाभाचा आहे. उद्योगातील नवनवीन योजनांच्या बाबतीत प्लसमायनस विचार करा आणि मगच योग्य तो निर्णय. घ्या. 

 

कन्या :–मनातील योजनाना प्रत्यक्षात आणण्यासाठी फार जीवाचा आटापिटा करावा लागणार नाही. स्वभावातील हळवेपणात वाढ होईल व  अचानक रडावेसे वाटेल. 

 

तूळ :–कायद्याच्या बाबतीत बेफिकीरीचे  धोरण  नुकसान करेल व दंड भरावा लागेल. शांत विचार करून हाती घेतलेल्या कामाचाच पाठपुरावा करत रहा. 

 

वृश्र्चिक :–कोणतीही भूमिका घेताना मनापासून प्रथम तडजोडीची भूमिका ठेवा. कोणत्याही अडचणी पासून पळवाटीचा मार्ग शोधू नका. वैयक्तिक जीवनात अतिशय काळजीपूर्वक रहावे लागेल. 

 

धनु :– स्वत:च्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे हा हेका सोडून द्या. पसंगी इतरांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. परिस्थितीपुढे माघार न घेता आत्मविश्वास व तज्ञांचा सल्ला या आधारावर चिकाटी ठेवा. 

 

मकर :–नव्याने झालेल्या परिचयातून मनाला आनंद व समाधान देणार्‍या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे विषय तडजोडीने पुढे नेल्यास  समाधान मिळेल. 

 

कुंभ :–मनात कोणतीही शंका न आणता मदतीच्या हाताचा स्विकार करा. कौटुंबिक व वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास   भविष्यात आर्थिक अडचण निर्माण होणार नाही

 

मीन :– आजच्या सकाळपासूनच तुम्हाला उत्साहात वाढ झाल्याचे जाणवेल. मानापमानाची  भावना बाजूला ठेवल्यास कौटुंबिक नात्यातील दुरावा कमी होऊ लागल्याचे जाणवेल. 

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *