daily horoscope

शनिवार 25 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 25 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 25 डिसेंबर 2021 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 29:04 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शनिवार 25 डिसेंबर 2021 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 29:04 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज ख्रिसमस, नाताळ आहे.

मेष :–लहान मुले, पाळणाघरे चालवणार्‍यांना आज मोठ्या अग्निदिव्यातून फार पडावे लागेल. तुम्हाला आज तुमच्या छंदाला वेळ देता येणार आहे. ब्युटीपार्लरच्या व्यवसायातील मंडळीना आजचा दिवस चांग ा लाभदायक जाणार आहे. 

 

वृषभ :–तुमच्या घराण्यातील  देव, कुळाचार पद्धती बाबत  तुम्हाला नवीन वेगळीच बातमी कळेल. नोकरीतील कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या आवडत्या कामाविषयीची चर्चा वरीष्ठांबरोबर कराल. 

 

मिथुन :–जाहिरात यंत्रणेत काम करणार्यांना डिजीटल क्षेत्रातील नवीन कामे खुणावू लागतील. लोकांच्या मनातील तुमच्या बाबतचा आदर  व्यक्त होईल. 

 

कर्क :–दुचाकी वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण मिळवावे लागेल. इंटरनेट इमेल  सर्विसेस  मधील कर्मचार्‍यांना  नवीन कामाची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्यांच्या हातातील कामात गुंतागुंत झाल्याचे जाणवेल. 

 

सिंह :–रिस्प्शनीस्ट, स्टेनोग्राफर मंडळीना आपल्या कामातील त्रुटींकडे लक्ष् द्यावे लागेल. बहिण भावामधील  झालेला दुरावा अचानक तुमच्या स्वत:च्याच विचाराने व वागणुकीचे दूर करू शकाल. 

 

कन्या :–स्वयंपाकघरातील कामातून वेळ काढून आज महिलांना  आपल्या आवडत्या छंदाला वेळ देता येईल. पाककौशल्याचा तुमचा  अनुभव  इतरांना मोठा हुरूप देणारा ठरेल

 

तूळ :–योग्य नियोजनामुळे जिद्धीने अवघड कामही आज पूर्ण करून दाखवाल. तुमच्याकडून थोरामोठ्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या

 

वृश्र्चिक :– आज तुमचा संताप अनावर होणार आहे तरी संयमाची आवश्यकता आहे. मित्रमंडळींच्या आहारी जाऊन नुकसान करून घ्याल. आज सर्वांपासून शक्यतो अलिप्त रहा

 

धनु :–कोणत्याही  यशस्वी  कामापेक्षा त्या कामाचे नियोजन महत्वाचे  असते हे पटेल. तुमच्याकडून कोणताच कायदा मोडला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल

 

मकर :–कायदेशीर मार्गाने प्रश्र्न सोडवताना इतर कोणत्याही मार्गाचा किंवा वशिल्याचा उपयोग करू नका. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना आंधळेपणाने करू नका

 

कुंभ :–आज तुम्हाला परिस्थितीनुसार तुमच्या विचारात बदल करावे लागतील. आर्थिक गुंतवणूक करताना  पूर्ण बारीक सारीक गोष्टींचा विचार करूनच करा अथवा आजचा व्यवहार टाळा

 

मीन :–जरी प्रवास लहानसा असला तरी महत्वाची वस्तू सांभाळा. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून कामाला लागा. व्यवसायाच्या विकासासाठी नवीन योजना लाभदायक ठरेल

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *