daily horoscope

शुक्रवार 24 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 24 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 24 डिसेंबर चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 28:09 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

शुक्रवार 24 डिसेंबर चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 28:09 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–नोकरीतील प्रत्येक गोष्टी अगदी बारकाईने न चुकता करा लहानशी चुकही महागात पडेल. पाठदुखीच्या व्यक्तींनी ओव्हर काँन्फीडन्सने  दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नये.

 

वृषभ :–जोडीदाराच्या आर्थिक व्यवहारात लक्ष घालावे लागणार असल्याचे जाणवेल. आईच्या प्रकृतीची काळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवेल.

 

मिथुन :–फोटोग्राफर मंडळीना अतिशय दुर्मिळ छायाचित्र घेण्याची संधी मिळेल. शेजारील मंडळींकडून आज तुम्हाला मोलाची मदत मिळणार आहे.

 

कर्क :–आज व्यवसायातून असो वा इतर कमिशन असो अचानक लाभ होणार आहे. आईच्या इच्छेची पूर्तता करण्याकरीता तुमच्या मधे  चढाओढ लागेल.

 

सिंह :–मुलांच्या बाबतीत  महत्वाच्या घडामोडीवर  तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

 

कन्या :–व्यवसायातील अडचणींवर आजपर्यंत न सापडलेला उपाय आईकडून सुचवला जाईल. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.

 

तूळ :–कोणत्याही परिस्थितीत झोपेच्या  गोळ्या घेऊ नका. न्यायालयातील कामकाजात आलेला अडथळा दूर करण्याकरीता कोणत्याही  प्रकारचा वशिला लाञू नका.

 

वृश्र्चिक :–राजकीय मंडळींच्या पुढे त्यांच्या  शत्रूचे   कांहीही चालणार नाही. कोर्टकेसमधून तसेच नोकरीतील चार्जशीट मधून सहजपणे सुटका होईल.

 

धनु :–शासकीय कागदपत्रांचा अर्थ न कळता त्यावर सही करू नका. फँक्टरी व वर्कशाँप मधे  काम करणार्यांना आजचा दिवस फारच आनंदाचा व समाधानाचा जाईल.

 

मकर :–शाळा काँलेजमधील शिक्षक  वर्गास नेमून दिलेल्या कामाप्रमाणे न चालल्याने  वरीष्ठांकडून खडे बोल ऐकवले जातील. विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीत अचानक मदत  मिळेल. 

 

कुंभ :–दत्तक पुत्रास किंवा मानस पुत्रास  मोठ्या रकमेची आर्थिक मदत करावी लागेल.तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तुमचे  आर्थिक नुकसान केले जाईल.

 

मीन :–पतीपत्नीमधील वाद संपुष्टात न आल्याने  कोर्टाची पायरी चढावी लागेल. विवाहाच्या बाबतीत तुमच्या अटीना  आज एकदम शिथीलता येईल.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *