Read in
बुधवार 22 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 22 डिसेंबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 24:44 पर्यंत व नंतर आश्लेषा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
बुधवार 22 डिसेंबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 24:44 पर्यंत व नंतर आश्लेषा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज संकष्ट चतुर्थी आहे व चंद्रोदय 20:48 वाजताचा आहे. ( मुंबई.)
मेष :–आज तुम्हाला अचानक मानसन्मानाचा लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक आपली प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल व लोकांकडून कौतुक होईल.
वृषभ :–गर्भवती महिलांना आज त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळतील त्यामुळे त्या खूप आनंदी होतील. कुटुंबातील सर्वजण आज एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करतील.
मिथुन :–लहान भावंडाकडून शिक्षणाच्या बाबतीत आलेली अडचण दूर केली जाईल. आजारपणातून बरे वाटलेल्या माताोश्रींना इतरांनी केलेल्या सेवेमुळे अतिशय समाधान वाटेल.
कर्क :–आज तुमची कोणत्याही विषयावर विचार करण्याची पद्धत सकारात्मक राहणार आहे. नोकरीतील तुमच्या अधिकारांच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागत नसल्याची खात्री करून घ्या.
सिंह :–कुटुंबापासून दूर परगावी, परदेशी गेलेल्यांना कुटुंबाची खूपच ओढ लागल्याने एकाकी पणा वाटेल. लहानशा घरगुती व्यवसायात नव्याने सुधारणा करण्याची गरज निर्माण होईल.
कन्या :–मानसिक विचारानुसार समोरील प्रसंग जाणवू लागतील. पूर्वनियोजित ठरलेल्या कार्यक्रमात इतरांच्या सोयीसाठी तुम्हाला बदल करावा लागेल.
तूळ :–महिलांना आज आपली प्रतिष्ठा वाढली असल्याचे जाणवेल. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या बळावर एखाद्या प्रतिष्ठेच्या सेमिनारमधे भाग घेता येईल.
वृश्र्चिक :–नोकरीतील कामानिमीत्त अचानक लहानशा प्रवास करावा लागेल. व्यवसायात भागिदाराच्या कडक वृत्तीमुळे कांही प्रमाणात अडचणी निर्माण होतील.
धनु :–व्यावहारिक विचाराने निर्णय घेतल्यास नुकसान होणार नाही. दुसर्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्यांच्याकडून काम करून घ्याल.
मकर :–मनाविरुद्ध घडणार्या घटनांमुळे मनाला त्रास होईल. संततीकडून त्याच्या नोकरीबाबतची आनंदाची बातमी कळेल. आवडत्या ठिकाणी जाण्याची प्रवासाची संधी मिळेल.
कुंभ :–व्यवसायातील भागिदारी मुळे तुमची पत प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्याचे नियोजन होईल.
मीन :–व्यवसायातील प्रतिस्पर्धी व्यक्तींकडून आज त्रास होण्याचा धोका आहे. तरूण तरूणींनी आज वाईट संगतीपासून सावध रहावे व स्वत:लाही सांभाळावे.
||शुभं-भवतु ¦¦